एक्स्प्लोर

Vedaant Madhavan : आर.माधवनच्या लेकाची दमदार कामगिरी, रौप्य पदकानंतर आता वेदांतने पटकावलं ‘सुवर्ण’पदक!

Vedaant Madhavan : चित्रपट अभिनेता आर. माधवनसाठी आजचा दिवस खूप खास आहे. माधवनच्या मुलाने केवळ आपल्या वडिलांचीच नाही, तर संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

Vedaant Madhavan : चित्रपट अभिनेता आर. माधवनसाठी (R. Madhavan) आजचा दिवस खूप खास आहे. माधवनच्या मुलाने केवळ आपल्या वडिलांचीच नाही, तर संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. सुपरस्टारचा मुलगा वेदांत माधवन (Vedaant Madhavan) याने डॅनिश ओपन 2022च्या स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. याआधी वेदांतने जलतरण स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते आणि आता वेदांतने सुवर्णपदक जिंकून देशाचा गौरव केला आहे.

मुलाच्या या यशाबद्दल आर. माधवनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने या यशामागे असलेल्या लोकांच्या मेहनत आणि प्रार्थनांचे आभार मानले आहेत. माधवनने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये वेदांत सुवर्णपदक परिधान केलेला दिसत आहे. वेदांतच्या सुवर्णपदक जिंकण्याची घोषणा केली जात आहे, तर वेदांत हात जोडून सर्वांचे आभार मानत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पोस्ट शेअर करताना अभिनेत्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'गोल्ड... तुमच्या प्रार्थना आणि देवाच्या कृपेने विजई घौडदौड सुरूच आहे.’ वेदांतने आज 800 मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. प्रशिक्षक, जलतरण महासंघ आणि संपूर्ण संघाचे आभार. वेदांतने 8:17.28 सेकंदात हा विजय मिळवला आहे. दुसरीकडे, आर माधवनच्या पोस्टवर कमेंट करत सर्व सेलिब्रिटींनीही वेदांतला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि आनंद व्यक्त केला. 

यापूर्वी वेदांत माधवनने पुरुषांच्या 1500 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. वेदांतने 10 जलतरणपटूंच्या अंतिम फेरीत 15.57.86 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले. आपल्या मुलाच्या या यशाबद्दल आर माधवनने आनंद व्यक्त केला.

वेदांतने जलतरण स्पर्धेत पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, 16 वर्षीय जलतरणपटूने बेंगळुरू येथे झालेल्या 47व्या ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये चार रौप्य पदके आणि तीन कांस्यपदके जिंकली होती. याआधी गेल्या वर्षी मार्चमध्ये, वेदांतने लॅटव्हियन ओपन स्विमिंग चॅम्पियन्स स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते आणि त्याच्या कामगिरीमुळेच लोकांनी माधवनच्या मुलाची तुलना अनेक स्टार किड्सशी करायला सुरुवात केली आणि म्हटले की, बॉलिवूडच्या स्टारकिड्स मधला हा फरक आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Bollywood Director on Tukaram Mundhe: 'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
Aavarapan 2 Actor Struggle: मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget