Piyush Mishra On Ranbir Kapoor: 'रणबीरसारखा घाणेरडा, निर्लज्ज माणूस...'; 345 कोटींचा मालक असलेल्या ऋषी कपूर यांच्या लेकाबद्दल काय बोलून गेला प्रसिद्ध अभिनेता?
Piyush Mishra Calls Ranbir Kapoor: रणबीरच्या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. पण, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि संगीतकार पियुष मिश्रा यांनी मात्र रणबीरबद्दल असं काही म्हटलंय की, ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

Piyush Mishra Calls Ranbir Kapoor: दिग्गज बॉलिवूड (Bollywood News) अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा लेक सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) सतत त्याच्या अभिनयात काहीतरी नवं आणतो आणि चाहत्यांचा आश्चर्याचा धक्का देतो. रणबीरनं अनेकदा आपल्या अभिनयानं स्वतःला सिद्ध केलं आहे. मग तो 'बर्फी' (Barfi Movie) असो वा अलिकडेच त्याचा आलेला 'अॅनिमल' (Animal Movie) सिनेमा असो. बर्फीमधल्या एका खोडकर मूकबधीर व्यक्तीरेखेपासून ते 'अॅनिमल' मधल्या एका रागीट वडिलांवर अफाट प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्यासाठी वेळप्रसंगी अतिहिंसक होणारा मुलगा साकारुन रणबीरनं सर्वांना आश्चर्यचकीत केलंय. रणबीरच्या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. पण, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि संगीतकार पियुष मिश्रा यांनी मात्र रणबीरबद्दल असं काही म्हटलंय की, ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत, खरंतर पियुष मिश्रा यांनी रणबीर कपूरचं कौतुक केलं आहे. पियुष मिश्र यांनी रणबीरसोबत 'रॉक्स्टार' आणि 'तमाशा' या सिनेमांमध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. पियुष मिश्रा म्हणाले की, "रणबीर सेटवर खूप शिस्तप्रिय असतो आणि एकदा शॉट संपला की तो निर्धास्त असतो..."
लल्लंटॉपला दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत, पियुष मिश्रा यांनी खुलासा केला की, रणबीर कपूरनं पहिल्या दिवसापासूनच त्यांना आश्चर्यचकित केलंय. ते म्हणाले की, रणबीर अत्यंत गंभीर आहे आणि सेटवर लक्ष केंद्रीत करतो, पण कॅमेरे बंद होताच तो पूर्णपणे बदलतो. पियुष मिश्रा म्हणाले की, "मी कधीही इतका नग्न आणि निर्लज्ज माणूस पाहिलेला नाही. कॅमेरा नसताना तो मुक्तपणे जगतो आणि त्यावेळी कौटुंबिक वारशाचा, सेलिब्रिटी असण्याचा कोणताही दबाव त्याच्यावर नसतो..."
पियुष मिश्रा म्हणाले की, रणबीर कपूरनं सिनेसृष्टीतील एका दिग्गज कुटुंबात जन्म घेतला, तरीसुद्धा त्याबाबत त्याचा कोणताही बडेजावपणा पाहायला मिळत नाही. त्या गोष्टीचं त्याच्यावर कधीच ओझं नसतं. त्यानं स्पष्ट केलं की, रणबीरचे पणजोबा आणि पृथ्वीराज कपूर यांच्यासारखं महान व्यक्तीमत्त्व त्याच्या कुटुंबातलं, असं असूनही तो, कॅमेऱ्यामागे एका सर्वसामान्य माणसासारखा साधेपणानं, अगदी हलकाफुलका जगतो. रणबीरमधील हा साधेपणा आणि स्वातंत्र्य पियुष यांना सर्वात जास्त प्रभावित करतं.
मी इतका निर्लज्ज माणूस कधीच पाहिला नाही... : पियूष मिश्रा (Piyush Mishra Calls Ranbir Kapoor)
पियुष पुढे म्हणाले, "अरे, विचारू नका. तो माणूस काही वेगळाच आहे. मी इतका निर्लज्ज माणूस कधीच पाहिला नाही. तो खूप जुना वारसा घेऊन आला आहे. त्याचे वडील, त्याचे आजोबा, त्याचे पणजोबा, अगदी पृथ्वीराज कपूर, पण यापैकी काहीही त्याच्यावर ओझं नाही. कोणताही दबाव नाही, अभिमान नाही, काहीही नाही. एक टक्काही नाही..."
त्याच संभाषणात, पियुष यांनी दिवंगत अभिनेता इरफान खानचीही आठवण काढली. ते म्हणाले की, तो इरफान खानच्या फार जवळचा नव्हता, पण त्यांच्यात खूप आदर होता. पियुष यांच्या मते, "आम्ही तिग्मांशू धुलिया किंवा विशाल भारद्वाजसारखे जवळचे मित्र नव्हतो. पण आम्ही नेहमीच एकमेकांच्या कामाचं कौतुक करायचो. आमचं नातं असंच होतं..." इरफान खानचे 29 एप्रिल 2020 रोजी कोलन इन्फेक्शनमुळे निधन झालं.
दरम्यान, रणबीर कपूर लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























