Pathaan Box office Collection: बॉक्स ऑफिसवर पठाणचा जलवा; जाणून घ्या पाचव्या दिवसाचं कलेक्शन
पठाण (Pathaan) हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. जाणून घेऊयात या चित्रपटाचं पाचव्या दिवसाचं कलेक्शन...
Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection: किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जादू सध्या बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. त्याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. चित्रपटातील डायलॉग्सचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटाचं पाचव्या दिवसाचं कलेक्शन...
पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाल आहेत. तरी या चित्रपटानं पाच दिवसात बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. 'पठाण'ने पहिल्या दिवशी 55 कोटी, दुसऱ्या दिवशी 68 कोटी, तिसऱ्या दिवशी 38 कोटी आणि चौथ्या दिवशी 51.50 कोटी एवढी कमाई केली. आता पाचव्या दिवशी या चित्रपटानं 65 कोटींची कमाई केली. पठाण या चित्रपटानं अवघ्या 5 दिवसांत 277 कोटींचा टप्पा पार केला आहे.
रमेश बाला यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन पठाणच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. रमेश बाला यांच्या ट्वीटनुसार, पठाण हा चित्रपट जगभरात 550 कोटींची कमाई करेल.
#Pathaan 5 days WW Gross expected to be in the range of ₹ 550 Crs..
— Ramesh Bala (@rameshlaus) January 30, 2023
शाहरुखचे आगामी चित्रपट
2023 हे वर्ष शाहरुखसाठी खास असणार आहे. कारण शाहरुखचा पठाण हा चित्रपट वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच 2 जूनला त्याचा जवान हा चित्रपट रिलीज होणार आहे, असंही म्हटलं जात आहे. तसेच, वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर महिन्यात त्याचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतो.
पठाणची तगडी स्टार कास्ट
पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा (Ashutosh Rana) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता सलमान खाननं देखील कॅमिओ केला आहे. या मल्टिस्टारर चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे.
भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. शाहरुखनं पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील शाहरुखच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली.
महत्वाच्या इतर बातम्या :
Pathan: क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं 'पठाण' पाहिल्यानंतर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'टाईमपास..."