(Source: ECI/ABP News/ABP Majha)
झोपडीत राहिला, मजुरी करून मिळायचे 40 रुपये, आज लाखो दिलों की दडकन, 'या' अभिनेत्याचा संघर्ष वाचून थक्क व्हाल!
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार प्रचंड मेहनत घेऊन मोठे झाले आहेत. यामध्ये एका तरुण अभिनेत्याचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांना प्रेमात पडलंय.
Jitendra Kumar Struggle Story: बॉलिवूडची दुनिया ही नेहमीच प्रत्येकाला आकर्षित करते. या क्षेत्रात काम मिळाल्यानंतर मिळणारा पैसा आणि प्रसिद्धी याची तुलनाच करता येत नाही. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत शून्यातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचणारे अनेक चेहरे आपल्याला माहिती आहेत. कष्ट, मेहनतीच्या जोरावर अनेकांनी या क्षेत्रात आपलं स्वत:चं नाव मोठं केलेलं आहे. मनोरंजनासाठी ओटीटी हे नवं दार खुलं झाल्यानंतर तर अभिनय क्षेत्रात अनेक नवे चेहरे उदयास आले. ओटीटीमुळे संपूर्ण भारतभरात ओळख निर्माण झालेल्या अशाच एका अभिनेत्याने अत्यंत हलाखीत दिवस काढलेले आहेत. त्याचा संघर्ष हा चित्रपटातील कथेलाही लाजवणार आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्याने केलेला हा संघर्ष खुद्द त्यानेच सांगितला आहे.
सचिव जी म्हणून सगळीकडे प्रसिद्धी
ओटीटी प्लॅटफॉर्मवर या अभिनेत्याचंच अधिराज्य आहे, असं म्हटलं तरी वावंग ठरणार नाही. त्यानं पंचायत या वेब मालिकेत प्रमुख पात्र साकारलेलं आहे. त्यामुळेच त्याला अनेकजन 'सचिव जी' म्हणूनच ओळखतात. त्यांनी पचायत या वेब सिरीजमध्ये केलेलं काम प्रत्येकालाचा आवडलेलं आहे. या अभिनेत्याचं नाव जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) असून आज त्याला जवळजवळ प्रत्येकजण ओलखतो. मात्र या अभिनेत्याने आपल्या बलपाणात खूपच कठीण काळ सोसलेला आहे.
सात ते आठ महिने राहिला झोपडीत
अभिनेता जितेंद्र कुमार हा लहानपणी एका छोट्या झोपडीत राहायचा. एका मुलाखतीत त्याने याबाबत सांगितलेले आहे. तो मूळचा अलवर येथील खैरतमधील आहे. लहानपणाबद्दल सांगताना जितेंद्र कुमार म्हणाला की,"जंगलात आमची एक झोपडी असायची. आम्ही आमचं सर्व कुटुंब एकत्रच होतं. तेव्हा आमच्याकडे एक पक्के घर आणि झोपडी होती. माझे वडील आणि काका आज सिव्हील इंजिनिअर आहेत. पुढे त्यांनी दोन नव्या खोल्या उभारल्या होत्या. मात्र या खोल्यांची उभारणी होण्यापूर्वी आम्ही सहा ते सात महिने झोपडीत राहिलो होतो."
मजुरी करून मिळवायचा 40 रुपये
"उन्हाळ्याच्या सुट्टीत मी तेव्हा बांधकाम चालू असलेल्या इमारतीत पेंटर आणि कारपेंटर यांच्यासोबत मी रोजंदारी मजूर म्हणून काम करायचो. माझ्या वडिलांना मात्र हे आवडलं नव्हतं. मी तेव्हा फक्त 11 वर्षांचा होतो. त्यावेळी दिवसभर मजुरी केल्यानंतर मला 40 रुपये मिळायचे. माझ्या वडिलांना माझ्या कामाबद्दल समजल्यानंत ते मला खूप रागवले होते," असंही त्याने या मुलाखतीत सांगितलं होतं.
हेही वाचा :
'स्टारकीड्सचा अपमान..' चित्रपटातील insider Outsider वादावर अनन्या स्पष्टच म्हणाली..