एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kantara Cast Accident: मोठी बातमी :'कांतारा'च्या कलाकारांचा भीषण अपघात, संपूर्ण टीमची बसच उलटली; सिनेमाचं शूटींगही थांबलं

Kantara Cast Accident: कांतारा चॅप्टर 1 सिनेमांच्या कलाकारांच्या बसचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

Kantara Cast Accident:  कर्नाटकात सध्या 'कांतारा चॅप्टर 1' (Kantara Cast Accident) सिनेमाचं शूटींग सुरु होतं. पण सध्या या सेटवरुन एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. शूटींगच्या सेटवरुन परतणाऱ्या कलाकारांच्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेमध्ये अनेक ज्युनियर कलाकारांना दुखापत झाली आहे. तसेच एक ज्युनिअर कलाकार गंभीर जखमी असल्याचंही सांगितलं जातंय. 

सध्या या अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची अधिक तपासणी केली जातेय.  यामध्ये अनेक कलाकारांना दुखापत झाल्याचंही सांगण्यात येत आहे. कलाकारांच्या संपूर्ण टीमच्या बसलाच हा भीषण अपघात झाला आहे. 

पोलिसांनी माहिती दिली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री चित्रपटाच्या टीमला घेऊन जाणारी मिनी बस  उलटली. "जडकलमधील मुदूर येथे शूटिंग पूर्ण करून ते कोल्लूरला परतत असताना ही घटना घडली," असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. मिनी बसमध्ये 20 कनिष्ठ कलाकार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर जखमींना जडकल आणि कुंदापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. कोल्लूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या या चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. या अभिनेत्यांच्या उपचाराची जबाबदारी प्रॉडक्शन हाऊस घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

'कंतारा' 2022 साली रिलीज झाला होता. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. अवघ्या 16 कोटींमध्ये तयार झालेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 207 कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता. सिनेमॅटोग्राफी, उत्तम दिग्दर्शन आणि कथानक या गोष्टींमुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.  या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. हा आता या सिनेमाचा प्रीक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कांतारा चॅप्टर 1 हा सिनेमा ऑक्टोबर 2025 रोजी रिलीज होणार आहे. यामध्ये ऋषभ शेट्टीही मुख्य भूमिकेत आहे.

ही बातमी वाचा : 

Abhishek Bachchan : अभिषेकने अखेर ऐश्वर्यावर भाष्य केलंच, चर्चांना पुन्हा उधाण; म्हणाला, ती घरी बसते म्हणून...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ram Shinde on Ajit Pawar : निवडणुकीत आलेल्या अपयशापेक्षा  कट रचून पराभव केला गेला याचं दु:खBharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वासVijay Wadettiwar Full PC : महायुतीला  विरोधकच ठेवायचे नाही - विजय वडेट्टीवारSharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Embed widget