One Four Three : 'हे आपलं काळीज हाय', 'वन फोर थ्री' चित्रपटाच्या रोमँटिक टिझरची जोरदार चर्चा!
Marathi Movie : 'वन फोर थ्री' (One Four Three) हा रिअल लाईफ स्टोरीवर आधारित रोमँटिक चित्रपट 'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' आणि विरकुमार शहा निर्मित असून, 4 मार्चला प्रदर्शित होणार आहे.
One Four Three Teaser : ‘हे आपलं काळीज हाय', 'करेन तर मामाचीच' या टॅगलाईनची चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना यांत भर घालण्यास 'वन फोर थ्री' (One Four Three) चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मधु आणि विशुची प्रेमकहाणी रेखाटणारा हा सिनेमा प्रेमीयुगुलांसाठी पर्वणी ठरणार, हे या टिझरमध्ये पाहायला मिळत आहे.
'वन फोर थ्री' हा रिअल लाईफ स्टोरीवर आधारित रोमँटिक चित्रपट 'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' आणि विरकुमार शहा निर्मित असून, 4 मार्चला प्रदर्शित होणार आहे. 'वन फोर थ्री' चित्रपटाचा टिझर पाहून त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेमाचा वर्षाव होत असून, सर्वत्र या टिझरची चर्चा रंगली आहे.
पाहा टीझर :
‘वन फोर थ्री' चित्रपटाचा टिझर 1 मिनिट 5 सेकंदाचा असून, या टिझरमधून संपूर्ण चित्रपटाची झलक स्पष्ट होते. दाक्षिणात्य चित्रपटाची धाटणी असलेल्या या चित्रपटाच्या टिझरमध्येही त्याचे प्रत्यक्ष काही सीन्स नजरेसमोर आहेत. आकंठ प्रेमात बुडालेल्या नायक आणि नायकाचा प्रेममय प्रवास, दरम्यान आलेले अडथळे वा खलनायकाच्या भूमिकेत उभे ठाकलेले सावट याचा सामना नायकाने कसा केला असेल, हे टिझरमधून स्पष्ट होत नसून ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
टिझरमधून अभिनेता योगेश भोसले आणि अभिनेत्री शीतल अहिरराव यांच्या लव्हस्टोरीची झलक पाहायला मिळत आहे, तर अभिनेता वृषभ शहाचं खलनायकी रूप पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या टिझरने मात्र चित्रपटाची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. नुकत्याच चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या 'झोंबिवली' चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी 'वन फोर थ्री' चित्रपटाच्या टिझरची झलक प्रेक्षकांना दाखवून या चित्रपटाची विशेष प्रशंसा करण्यात आली.
'वन फोर थ्री' चित्रपटाच्या टॅगलाईनची चर्चा लहानग्यांपासून ते तरुणाईमध्ये अधिक असून, हा चित्रपट आणखी काय नवे घेऊन येणार याची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मात्र, जास्त विलंब न करता हा चित्रपट प्रेमाचे विविध रंग घेऊन 4 मार्चला सोनेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज आहे.
इतर बातम्या :
- Shweta Tiwari : श्वेता तिवारीचं अंतर्वस्त्रांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाली...
- Shweta Tiwari Controversy : हे सहन करणार नाही; श्वेता तिवारीच्या वक्तव्यावर भडकले मध्य प्रदेशचे गृहमंत्री
- Dharmaveer : ‘धर्मवीर’ चित्रपटात उलगडणार आनंद दिघे यांचा जीवनपट, मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha