एक्स्प्लोर

One Four Three Movie : कोरोनाची धास्ती, प्रेमाची अनोखी केमिस्ट्री सांगणाऱ्या 'वन फोर थ्री'चे प्रदर्शन लांबणीवर!

Marathi Movie : प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यास 'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' निर्मित आणि  विरकुमार शहा निर्मित 'वन फोर थ्री' हा खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

One Four Three : अलीकडे सर्व काही रुळावर येऊ लागले असताना, पुन्हा एकदा कोरोनाने त्याचे स्वरूप बदलले आहे आणि त्यात ओमायक्रॉनमुळे (Omicron) पुन्हा नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईवर परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. रोमँटिक चित्रपटांच्या यादीत ‘वन फोर थ्री’ चित्रपटाने आपले नाव नोंदवले असले तरी हा चित्रपट काहीसा लांबणीवर गेला आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख नुकतीच समोर आली आहे. प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यास 'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' निर्मित आणि  विरकुमार शहा निर्मित 'वन फोर थ्री' हा खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट असून, बॉलिवूडने देखील या चित्रपटाची दखल घेतली होती. मात्र, हा चित्रपट 11 फेब्रुवारी ऐवजी 4 मार्चला प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

चित्रपटाची नवी तारीख जाहीर करत दिग्दर्शक म्हणाले की, 'जगभरात कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्रॉनची भीती यामुळे नववर्षात पुन्हा एकदा संकट येऊन उभे राहिले आहे. वन फोर थ्री चित्रपट हा प्रेमाचे फंडे देणारा असल्याने हा चित्रपट प्रेमाच्या महिन्यात म्हणजेच व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधत प्रदर्शित करण्याचे आयोजले होते. मात्र, कोरोना आणि ओमायक्रॉनच्या नव्या संकटामुळे 11 फेब्रुवारीऐवजी हा चित्रपट 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अचानक उद्धवलेल्या या संकटामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यास काही दिवस वाट पाहावी लागणार आहे'.

या चित्रपटात अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. तर अभिनेता वृषभ शहा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत दमदार असे पदार्पण करणार आहे. ‘हे आपलं काळीज हाय’ या 'वन फोर थ्री' चित्रपटाच्या टॅगलाईनने आधीच धुमाकूळ घातला असताना हा चित्रपट काय नवे घेऊन येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपट प्रदर्शन लांबणीवर गेल्याने प्रेक्षकांमध्ये थोडीशी नाराजी दिसून येत आहे. मात्र, जास्त विलंब न करता हा चित्रपट प्रेमाचे विविध रंग घेऊन 4 मार्चला मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज आहे.

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
Mahesh Manjrekar On Aamne Samne: 'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
Yo Yo Honey Singhs nephew Death: हनी सिंगवर दु:खाचा डोंगर; पुतण्याचा भीषण कार अपघातात मृत्यू, मित्राचाही जीव गेला, रॅपरची भावूक पोस्ट
हनी सिंगवर दु:खाचा डोंगर; पुतण्याचा भीषण कार अपघातात मृत्यू, मित्राचाही जीव गेला, रॅपरची भावूक पोस्ट
Pooja Birari and Usha Nadkarni Serial: आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?
आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget