आता 'जीव' होणार हिंदीत 'येडापिसा'
गेल्या काही काळापासून अनेक मराठी मालिकांनी हिंदीत उडी घेतली आहे. आता यात आणखी एका मालिकेची भर पडणार नाही. या मालिकेचं नाव आहे जीव झाला येडापिसा. या बनणाऱ्या हिंदी मालिकेत शिवाची भूमिका साकारणार आहे अस्सल मराठमोळा कलाकार.
छोट्या पडद्यावर रसिक जीवापाड प्रेम करतात. रोजच्या मालिका घराघरांत मनोरंजन करत असल्यामुळे छोट्या पडद्यावरची पात्रं ही सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचा भाग होतात. या व्यक्तिरेखांवर ही मंडळी प्रेम करू लागतात. त्यानंतरच मालिकांमधल्या कथानकांना रंगत चढते. कलर्स मराठीवर येणारी जीव झाला येडापिसा ही मालिकाही अशीच आहे. या मालिकेतल्या शिवा लष्करे या व्यक्तिरेखेने रसिकमनाला भूरळ घातली आहे. या मालिकेची क्रेझ लक्षात घेऊन आता ही मालिका हिदीतही बनवली जाणार आहे. याबद्दल नुकतीच माहीती मिळाली आहे. विशेष बाब अशी की हिंदीत ही मालिका येत असली तरी या हिंदी मालिकेतली शिवा लष्करेची व्यक्तिरेखा साकारणार आहे तो कोल्हापूरचा आदित्य रेडीज हा कलावंत.
जीव झाला येडापिसा ही मालिका रसिकांना खूपच आवडली. गावरान शिवा आणि त्याची सिद्धी ही कन्सेप्ट लोकांना भावली. म्हणूनच ही मालिका घरोघरी पाहिली जाते. आता ही मालिका हिंदीत बनणार आहे. मराठी मालिका हिंदीत बनणं नवं नाही. बऱ्याचदा मराठी टीव्ही इंडस्ट्रीत चांगल्या आशयाच्या मालिका बनत असल्यामुळे इतर भाषिकांना या मालिका हव्या असतात. काहीवेळा या मालिकांचा अनुवाद होतो. म्हणजे मालिका संपूर्ण तीच ठेवून केवळ ती नव्याने त्या त्या प्रादेशिक भाषेत डब केली जाते. किंवा संपूर्णत: ही मालिका नव्याने शूट केली जाते. त्यावेळी कथानक तेच ठेवून बाकी त्यातल्या सगळ्या व्यक्तिरेखा बदलल्या जातात.नव्याने त्या या मालिकेत येतात. जीव झाला येडापिसा ही मालिका हिंदीत येते आहे खरी. पण ती नव्याने शूट होणार आहे.
मराठीत ही मालिका आली तेव्हा शिवाची भूमिकाा साकारली होती गोव्याच्या अशोक फळदेसाई यानेे. तर त्यातली सिद्धी साकारली आहे, विदुला चौगुलेेने. विदुला ही कोल्हापूरचीच मुलगी. अत्यंत लहान वयात तिला ही मालिका मिळाली. त्यानंतर शिवा-सिद्धी या जोडीचं खूपच कौतुक झालं. आता ही मालिका हिंदीत येताना त्यात शिवाची भूमिका साकारणार आहे कोल्हापूरचा आदित्य रेडिज. आदित्यने या नव्या इनिंगसाठी जोरदार तयारी केली आहे. त्याने जीव झाला येडापिसा या मालिकेचे झालेल एपिसोड वेड्यासारखे पाहून ठेवले आहेत. अशोक फळदेसाईने याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. कोणत्याही कलाकाराला आपण करत असलेली मालिका दुसऱ्या भाषेत जावी असं वाटत असतंच. हे संपूर्ण टीमचं यश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी मालिका इतर भाषांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. सध्या मराठीमध्ये टीआरपीमध्ये आघाडीवर असलेली आई कुठे काय करते ही मालिका अनुपमा नावाने हिंदीत लोकप्रिय झाली आहे. तर मराठीत रंग माझा वेगळा ही मालिकाही हिंदी सुरू झाली आणि ती लोकांना आवडली. त्यात आता नव्याने भर पडणार आहे ती जीव झाला येडापिसा या मालिकेच्या निमित्ताने.