(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Netflix : नेटफ्लिक्सला मोठा झटका; 100 दिवसांत लाखोंनी सब्सक्रायबर्स घटले, कंपनीनं सांगितलं 'हे' कारण
Netflix : 100 दिवसांमध्ये नेटफ्लिक्सचे दोन लाखपेक्षा जास्त सब्सक्रायबर्स कमी झाले आहे.
Netflix : चित्रपट, वेब सीरिज, डॉक्यूमेंट्री इत्यादी पाहण्यासाठी अनेक लोक नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफोर्मचा वापर करतात. पण नेटफ्लिक्स या कंपनीचं गेल्या तीन महिन्यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. रिपोर्टनुसार नेटफ्लिक्सचे लाखो सब्सक्रायबर्स घटले आहेत. जवळपास 100 दिवसांमध्ये नेटफ्लिक्सचे दोन लाखपेक्षा जास्त सब्सक्रायबर्स कमी झाले आहे. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तीन महिन्यांमध्ये नेटफ्लिक्स युझरची संख्या 221.6 मिलियन झाली आहे.
सब्सक्रायबर्स कमी होण्याचं काय आहे कारण?
नेटफ्लिक्स कंपनीनं दावा केला आहे की, सब्सक्रायबर्स कमी होण्याचं कारण रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध आहे. रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सनं रशियामध्ये त्यांची सेवा बंद केली आहे. तसेच कोरोनामुळे अनेक लोक वर्क-फ्रॉम होम करत आहेत. यामुळे 2020 मध्ये कंपनीचा ग्रोथ रेट वाढला होता. पण अनेक लोक त्यांच्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना सोडून इतर व्यक्तींना देखील त्यांच्या नेटफ्लिक्सच्या अकाऊंटचे डिटेल्स देत होते. त्यामुळे देखील नेटफ्लिक्सचे नुकसान झाले, असं ही कंपनीनं सांगितलं.
सिलिकॉन व्हॅली टेक फर्म नेटफ्लिक्सने या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये 1.6 बिलियन डॉलर एवढी कमाई केली. तर गेल्या वर्षी पहिल्या तीन महिन्यात कंपनीनं एकूण कमाई 1.7 बिलियन डॉलर कमाई केली होती. नेटफ्लिक्सचे दोन लाख सब्सक्रायबर्स कमी झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये 25 टक्क्यांची घसरण झाली आहे.
कंपनीने सांगितले की, सुमारे 222 मिलियन कुटुंब हे नेटफ्लिक्सचा वापर करत आहेत. पण नेटफ्लिक्स खात्यांची संख्या 100 मिलियन आहे. स्वस्त इंटरनेट डेटा असल्यानं स्मार्ट टीव्हीवर देखील लोक नेटफ्लिक्स वापरत आहेत. परंतु टेलिव्हिजन स्ट्रीमिंग सेवेचे ते पैसे देत नाहीत.
संबंधित बातम्या