Mirzapur Lalit actor Bramha Mishra Death : बाथरूममध्ये सापडले शव; शेजारच्यांनी पोलिसांना दिली माहिती; ब्रह्मा मिश्रांच्या मृत्यूचं गूढ कायम
प्रसिद्ध वेब सिरीज 'मिर्झापूर'मधील (Mirzapur) मुन्ना भैय्याचा खास मित्र असणाऱ्या ललितची (Mirzapur Lalit) भूमिका साकारणारे ब्रह्मा मिश्रा याचं निधन (Bramha Mishra) झालं आहे.
Mirzapur Lalit Bramha Mishra Death : प्रसिद्ध वेब सिरीज 'मिर्झापूर'मधील (Mirzapur) मुन्ना भैय्याचा खास मित्र असणाऱ्या ललितची (Mirzapur Lalit) भूमिका साकारणारे ब्रह्मा मिश्रा याचं निधन (Bramha Mishra Death) झालं आहे. वयाच्या 36 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. अनेक कलाकारांनी ब्रह्मा मिश्रा यांना श्रद्धांजली दिली. एका रिपोर्टमधून असे समोर आले आहे की, ब्रह्मा मिश्रा यांचे शव त्यांच्या वर्सोवा येथील घराच्या बाथरूमध्ये सापडला.
एका रिपोर्टनुसार ब्रह्मा मिश्रा हे गेली चार वर्ष वर्सोवा येथील एका अपार्टमेंटमध्ये एकटे राहात होते. या आपार्टमेंटमधील लोकांनी पोलिसांना फोन करून सोसायटीमध्ये वास येत असल्याची तक्रार केली. त्यानंतर पोलिस ब्रह्मा मिश्रा यांच्या फ्लॅटमध्ये गेले तेव्हा तो फ्लॅट आतून बंद होता. पोलिसांनी डुप्लीकेट चावीचा वापर करून फ्लॅटचा दरवाजा उघडला. तेव्हा पोलिसांना बाथरूममध्ये ब्रह्मा मिश्रा यांची सेमी डिकम्पोजड आवस्थेतील डेड बॉडी सापडली.
View this post on Instagram
अभिनेता दिव्येंदुने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने लिहीले, 'RIP ब्रह्मा मिश्रा, आपण सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात'
ब्रह्मा यांनी 2013 मध्ये चोर चोर सुपर चोर या चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण केलं. अनेक चित्रपटात काम केलेल्यानंतर ब्रह्माला मिर्झापूरमधील ललित भूमिकेला विशेष लोकप्रियता मिळाली. ब्रह्मा हे अभिनेता मनोज वाजपेयी यांना आपला रोल मॉडल मानत असल्याचं त्यांनी एका सोशल मीडियापोस्टमधून स्वत: सांगितलं होतं.