Meena Sagar : ' कृपया चुकीची माहिती देणं बंद करा'; पतीच्या निधनानंतर अभिनेत्री मीनाकडून पोस्ट शेअर
अभिनेत्री मीनानं (Meena) नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
Meena Sagar : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मीनाचे (Meena) पती विद्यासागर (Vidyasagar) यांचे सोमवारी चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. मीना यांचे पती विद्यासागर यांच्या निधनामुळे साऊथ इंडस्ट्रीत शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर काही अफवा पसरत होत्या. नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन मीनानं चुकीची माहिती देणं बंद करण्याची विनंती लोकांना केली आहे.
मीनाची पोस्ट
मीनानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'माझे प्रिय पती विद्यासागर यांच्या निधनामुळे मला खूप दु:ख झाले आहे. मी सर्व माध्यमांना आमच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची आणि या परिस्थितीचा विचार सहानुभूतीपूर्वक करण्याची विनंती करते. कृपया याबाबत चुकीच्या माहिती देणं बंद करा.' पुढे तिनं लिहिलं, 'या कठीण काळात, मला त्या सर्व लोकांचे आभार मानायचे आहेत ज्यांनी आमच्या कुटुंबाला मदत केली आणि आमच्या पाठिशी उभे केले. मी सर्व वैद्यकीय टीमचे आभार मानू इच्छिते ज्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, राधाकृष्णन IAS, सहकारी, मित्र, कुटुंब, मीडिया आणि माझे चाहते. या सर्वांचे मी आभार मानते.'
View this post on Instagram
मीनाच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्यानं मीनाच्या या पोस्टला कमेंट केली, 'मॅम तुम्ही स्ट्रॉन्ग राहा. तुमच्या मुलांना तुमची गरज आहे. '
अभिनेत्री मीनानं 2009 मध्ये बंगळुरूचे उद्योगपती विद्यासागर यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. या जोडप्याला नैनिका नावाची एक मुलगी आहे. निकानेही तिच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत 'थेरी' चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली आहे. मीनाने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. नंतर तिनं मुख्य अभिनेत्री म्हणून चित्रपटांमध्ये पदार्पण केले. 1990 ते 2000च्या दशकापर्यंत मीनानं इंडस्ट्रीमध्ये भरपूर नाव कमावले होते. साऊथमधील जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत मीनानं स्क्रीन शेअर केली आहे.
हेही वाचा: