(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Singer KK Passes Away : केके यांनी मराठी गाणही गायलं होतं; 'वेड लागले हे' गाणं ऐकलं का?
हिंदीसोबतच मराठी गाणी भाषेमधील गाणी देखील केके यांनी गायली आहेत.
Singer KK Passes Away : प्रसिद्ध गायक केके (Singer KK) उर्फ कृष्ण कुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हिंदीसोबतच मराठी गाणी भाषेमधील गाणी देखील केके यांनी गायली आहेत.
केके यांनी गायलेले मराठी गाणे
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या फ्रेंडशिप डॉट कॉम या चित्रपटामधील 'वेड लागले हे' गाण्यामधील हे रोमँटिक गाणं केके यांनी गायले आहे. या गाण्यामधून केके यांनी मराठी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. फ्रेंडशिप डॉट कॉम या चित्रपटामध्ये मृण्मयी गोंदलेकर आणि सूरज भोगडे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
नऊ भाषांमध्ये केली गाणी रेकॉर्ड
केके यांनी हिंदीसोबतच नऊ भाषांमधील गाणी रेकॉर्ड केली आहेत. हिंदी आणि मराठीबरोबरच तमिळ, तेलगू, मल्याळम, ओरिया आणि आसामी या भाषांमधील गाणी देखील केके यांनी गायली आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये केकेनं 200 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. फिल्मफेयर अवार्ड देऊन देखील केके यांनी गौरवण्यात आलं आहे. 'माचीस' चित्रपटातील गाण्यांमधून गायक केके यांना विशेष लोकप्रियता मिळाली. माचीस चित्रपटामधील छोड आये हम... या चित्रपटातील गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल चुके सनम' या चित्रपटामधील तड़प तड़प के... या केके यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्तासह अनेक सेलिब्रिटींनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. केके सर या जगात आता नाहीत, यावर आमचा विश्वासच बसत नाही, असे म्हणत अरमानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायकांपैकी केके एक आहेत. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
इतर संबंधित बातम्या
- Krishnakumar Kunnath Died : गायक केके यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा, पंतप्रधान मोदींसह मान्यवरांकडून श्रद्धांजली
- Krishnakumar Kunnath Died: केकेने गायलेली 'ही' गाणी कधीच विसरता येणार नाही
- Krishnakumar Kunnath Died : गायक केके यांचे निधन, कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदयविकाराचा झटका