Krishnakumar Kunnath Died : गायक केके यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा, पंतप्रधान मोदींसह मान्यवरांकडून श्रद्धांजली
Krishnakumar Kunnath Died : केके यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Krishnakumar Kunnath Died : प्रसिद्ध गायक केके (Krishnakumar Kunnath) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदय विकाराच्या झटका आल्याने त्यांना CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. केके यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी शोक व्यक्त करत केके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले आहे. के.के. यांच्या गाण्यांमध्ये सर्व वयोगटातील लोकांच्या विविध प्रकारच्या भावनांचे प्रतिबिंब दिसून आले. त्यांच्या गाण्यातून ते आमच्या कायम स्मरणात राहतील, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
Saddened by the untimely demise of noted singer Krishnakumar Kunnath popularly known as KK. His songs reflected a wide range of emotions as struck a chord with people of all age groups. We will always remember him through his songs. Condolences to his family and fans. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2022
नरेंद्र मोदी यांच्यासह बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्ता यांच्यासह भारताचा माजी क्रिकेटपट्टू विरेंद्र सेहवाग याने केके यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्दांजली वाहिती आहे. केके सर या जगात आता नाहीत, यावर आमचा विश्वासच बसत नाही, असे म्हणत अरमान मलिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Extremely sad and shocked to know of the sad demise of KK. What a loss! Om Shanti 🙏🏻
— Akshay Kumar (@akshaykumar) May 31, 2022