KGF 2 : ‘बाहुबली’ ते ‘आरआरआर’ साऱ्यांनाच धोबीपछाड! यशच्या ‘केजीएफ 2’ची रिलीजपूर्वीच बक्कळ कमाई!
KGF 2 : कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाला इतकी मोठी लोकप्रियता आहे की, तो प्रदर्शित करण्यासाठी स्क्रीन वाढवाव्या लागत आहेत.
KGF 2 : कन्नड चित्रपट 'KGF 2' ने संपूर्ण भारतात रिलीज होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाला इतकी मोठी लोकप्रियता आहे की, तो प्रदर्शित करण्यासाठी स्क्रीन वाढवाव्या लागत आहेत. 'बीस्ट' हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित करण्यावरून निर्माण झालेल्या वादाचा फायदा 'केजीएफ 2' चित्रपटाला मिळताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने भारतीय चित्रपटांच्या इतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
फक्त हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, 'वॉर' चित्रपटाने आतापर्यंत सर्वाधिक 32 कोटी रुपयांचे अॅडव्हान्स बुकिंग कमावले होते. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटानंतर सलमान खानच्या 'सुलतान', 'टायगर जिंदा है' आणि 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हे चित्रपट येतात. सर्व भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर, हा बहुमान 'बाहुबली 2' या चित्रपटाच्या नावावर असून, या चित्रपटाने 37 कोटींची कमाई केली होती. 'RRR' चित्रपटाने गेल्या महिन्यात 58.73 कोटींची अॅडव्हान्स बुकिंग कमाई करून हा रेकॉर्ड मोडला होता. मात्र, आता 'KGF 2' चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने हा आकडाही ओलांडला आहे.
रिलीजपूर्वीच विक्रम
‘केजीएफ 2’ मूळ भाषा कन्नड व्यतिरिक्त हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळममध्ये प्रदर्शित होणार आहे. सर्वाधिक अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने नवा विक्रम तर केला आहेच, पण रिलीजपूर्वीच या चित्रपटाने आणखी काही विक्रमही केले आहेत. 'KGF 2' चित्रपटाने तिकिटांच्या आगाऊ विक्रीतून तब्बल एकूण 65.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘बाहुबली’लाही टाकले मागे!
एवढ्या मोठ्या संख्येने तिकिटांची आगाऊ विक्री पाहता 'KGF 2' चित्रपट दाखवणाऱ्या स्क्रीन्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक व्यतिरिक्त आता गुजरातमध्ये सकाळी 6 वाजता चित्रपटाचा पहिला शो सुरू होणार असल्याची माहिती आहे. 'KGF 2' चित्रपट पहिल्या दिवसाच्या एकूण कमाईमध्ये 'RRR' चित्रपटाचा विक्रमही मोडेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.
केवळ आगाऊ बुकिंगच नाही, तर या चित्रपटाने इतर सर्व विक्रमही रिलीजपूर्वी केले आहेत. हा चित्रपट कर्नाटक राज्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरणार आहे. एकट्या बेंगळुरू शहरात या चित्रपटाची 10 कोटी रुपयांची आगाऊ तिकिटे विकली गेली आहेत. 'KGF 2' या चित्रपटानेही हिंदीत प्रदर्शित झालेल्या कोणत्याही डब चित्रपटाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा नवा विक्रम केला आहे. आधी हा विक्रम 'बाहुबली 2' या चित्रपटाच्या नावावर होता, ज्याने 41 कोटींची कमाई केली होती.
हेही वाचा :
- Jersey : 'जर्सी' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित
- Acharya Trailer : बाप-लेक पुन्हा करणार धमाका, चिरंजीवी-राम चरणच्या 'आचार्य'चा ट्रेलर आऊट
- Dharmaveer movie Teaser : 'जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर करायचं नाही'; आनंद दिघे यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर