Acharya Trailer : बाप-लेक पुन्हा करणार धमाका, चिरंजीवी-राम चरणच्या 'आचार्य'चा ट्रेलर आऊट
Acharya Trailer : 'आचार्य' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Acharya Trailer : दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) आणि राम चरणच्या (Ram Charan)'आचार्य' (Acharya) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी बाप-लेक सज्ज झाले आहेत. ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहेत. 'पुष्पा द राइज', 'आरआरआर' या सिनेमांनी चांगलाल गल्ला जमवला आहे. आता 'बीस्ट' आणि 'केजीएफ 2' हे सिनेमे सिनेमागृहात सिनेमागृहात धुमाकूळ घातलण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'आचार्य' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे.
View this post on Instagram
ट्रेलरवरून सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे, याचा अंदाज येतो. रामचरण आणि चिरंजीवी या सिनेमात अॅक्शन करताना दिसणार आहेत. कोरटाला सिवा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण आता हा सिनेमा 29 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या