Jersey : 'जर्सी' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित
Jersey : शाहिद कपूरचा आगामी 'जर्सी' सिनेमा 22 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Jersey : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) बहुप्रतिक्षित 'जर्सी' (Jersey) सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता हा सिनेमा 22 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
'जर्सी' सिनेमा आधी 14 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण आता निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. 14 एप्रिलला 'बीस्ट' आणि 'केजीएफ 2' हे बिग बजेट सिनेमेदेखील प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन सिनेमांची टक्कर पाहायला मिळणार आहे. शाहिद कपूरच्या क्रिकेटसाठीच्या संघर्षावर 'जर्सी' सिनेमा भाष्य करणारा आहे.
View this post on Instagram
शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर 'जर्सी' सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 'जर्सी' सिनेमात मृणाल ठाकूर शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केले आहे. शाहिद आणि मृणाल पहिल्यांदाच या सिनेमात एकत्र दिसणार आहेत.
संबंधित बातम्या
Runway 34 Trailer : 'रनवे 34'चा ट्रेलर आऊट, सत्य घटनेवर आधारित सिनेमा लवकरच होणार प्रदर्शित
Sher Shivraj : शेर शिवराजचा जबरदस्त ट्रेलर रिलीज; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार अफझल खानाची भूमिका
The Kashmir Files : 31 व्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर 'द कश्मीर फाइल्स'ची जादू; 250 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)