एक्स्प्लोर

Viral Video : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीने गायले रोमँटिक गाणे, नेटकरी म्हणाले...

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी व कार्तिक आर्यन यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित झाला.

Kartik Aaryan And Kiara Advani Singing Video : बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) व कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपट चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकत आहेत.सोशल मीडियावर बरेच लोक 'सत्यप्रेम की कथा'या चित्रपटाचे पोस्ट शेअर करून कियारा अडवाणी व कार्तिक आर्यन यांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. बाॅक्स आॅफिसवर देखील या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर याच चित्रपटातील "आज के बाद तू मेरी रेहना" हे रोमँटीक गाणे कियारा अडवाणी व कार्तिक आर्यन यांनी गायले आहे. अभिनेता कार्तिक आर्यनने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीने गाणे गायलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच कार्तिक आर्यनने या व्हिडीओखाली फार मजेशीर कॅप्शन लिहीले आहे , "गाणे असे गा कि,चार लोक म्हणतील अजिबात गाऊ नका."

'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाच्या लेखकांनी पहिल्यांदा हा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले होते , "यांची तर गायनाची केमिस्ट्रीही देखील 100 टक्के भारी आहे." याआधी देखील कियाराने चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्या व्हिडीओमध्ये प्रेक्षकांनी चित्रपट पाहून झाल्यावर स्टँडिंग ओव्हेशन दिले आहे. या खाली तिने कॅप्शन लिहिले आहे , 'जेव्हा प्रेक्षक स्टँडिंग ओव्हेशन देतात, तेव्हा तुम्हाला समजते की, चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.'

हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी यावर फार मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने “गाणं नाही पण, चित्रपटात अभिनय उत्तम केला आहे.” असे म्हणत या जोडीचे कौतुक केले तर, दुसऱ्या एका युजरने “गाण्याचे शब्द बदला आणि ‘कभी मत गाना आज के बाद’ असं बोला…” अशा कमेंट्स केल्या आहेत. "बरे झाले सत्तू आणि कथा दांडीया खेळताना एकत्र भेटले इंडियन आयडियलच्या आॅडिशनमध्ये भेटले नाहीत." "तुम्ही राहू द्यात गायचे आम्ही स्पाॅटीफायचे सबस्क्रिप्शन घेतो." अशा मजेशीर कमेंट्स देखील अनेक नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

हे रोमँटिक गाणे मनन भारद्वाज यांनी लिहिले आणि कंपोज केले आहे.गायिका तुलसी कुमारसोबत त्यांनी हे गाणेही गायले आहे. तर त्यांनी हिमानी कपूरसोबत या गाण्याचे दुसरे व्हर्जन गायले आहे.  समीर विद्वांस यांनी  हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.या चित्रपटात गजराज राव, सुप्रिया पाठक, राजपाल यादव आणि शिखा  तल्सानिया यांच्याही भूमिका आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाची कमाई 38.50 करोड झाली आहे. कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यन यांचा भूल भूलैय्या-2 हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता 'सत्यप्रेम की कथा'  या चित्रपटामधून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा ट्रेलर आऊट; आलिया-रणवीरच्या सिझलिंग केमिस्ट्रीने जिंकली प्रेक्षकांचं 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget