Siddharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्रानं 'सत्यप्रेम की कथा' मधील कियाराच्या अभिनयाचं केलं कौतुक; शेअर केली खास पोस्ट
'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाबाबत नुकतीच कियाराचा पती सिद्धार्थ मल्होत्रानं (Sidharth Malhotra) एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Sidharth Malhotra On Kiara Advani Film Satyaprem Ki Katha: अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Sidharth Malhotra) यांचा 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. 'भूल भुलैया 2' चित्रपटानंतर कियारा आणि कार्तिक यांची केमिस्ट्री आता 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाबाबत नुकतीच कियाराचा पती सिद्धार्थ मल्होत्रानं (Sidharth Malhotra) एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून सिद्धार्थनं कियाराचं कौतुक केलं आहे.
सिद्धार्थची पोस्ट
अभिनेते सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियारा अडवाणीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.सिद्धार्थनं पोस्टमध्ये लिहिलं, 'ही एक सामाजिक संदेश देणारी प्रेमकथा आहे, ज्यामध्ये संपूर्ण कलाकारांनी जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे, पण कथा तू माझं हृदय आहेस. कियारा, मला खूप आनंद झाला की,तू ही भूमिका निवडली. तुझे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन.' कियारानं सिद्धार्थची पोस्ट रिपोस्ट करुन 'थँक्यु माय लव्ह' असं लिहिलं आहे.
'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटानं पहिल्या दिवशी केली एवढी कमाई
'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाचं सोशल मीडियावर अनेक जण कौतुक करत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. काही लोक ट्विटरवर ट्वीट करुन या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत आहेत. 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 9 कोटी रुपयांची कमाई केली आहे, असं म्हटलं जात आहे. आता वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला सिद्धार्थ मल्होत्रानं हजेरी लावली होती. 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामध्ये कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांच्यासोबत गजराज राव, सुप्रिया पाठक आणि शिखा तलसानिया या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. समीर विद्वांस या मराठमोळ्या दिग्दर्शकानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
संबंधित बातम्या