Kiara Advani : कियारा आडवाणी प्रेग्नंट? 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण; बेबी बंपने वेधलं चाहत्यांचं लक्ष
Kiara Advani : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
Kiara Advani Pregnancy : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) सध्या चर्चेत आहे. लवकरच तिचा 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ती या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. अशातच आता कियारा आडवाणी प्रेग्नंट (Kiara Advani Pregnant) असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानचा कियारा आडवाणीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कियाराचे बेबी बंप दिसत असल्याने ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या फोटोमध्ये कियाराने भगव्या रंगाच्या ब्रालेटसोबत मॅचिंग ब्लेझर आणि पॅन्ट परिधान केलेली दिसत आहे. तसेच मोकळ्या केसांमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे. पण कियाराच्या बेबी बंपने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
View this post on Instagram
कियाराच्या बेबी बंपने वेधलं चाहत्यांचं लक्ष
कियाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कियारा प्रेग्नंट आहेस? बेबी बंप स्पष्ट दिसत आहेस. कियाराच्या प्रेग्नंसीची बातमी सिद्धार्थला सांगायला हवी, कियारा फक्त मलाच प्रेग्नंट वाटत आहे..की इतरांनाही ती तशीच दिसत आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. 7 फेब्रुवारी 2023 रोजी ते लग्नबंधनात अडकले आहेत. राजस्थानातील एका महालात त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता कियारा प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जात आहे.
कियाराचा 'सत्यप्रेम की कथा' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज
'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट 29 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भूल भुलैया-2 या चित्रपटानंतर नंतर कार्तिक आणि कियारा यांची जोडी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सुप्रिया पाठक, गजराज राव, अनुराधा पटेल, राजपाल यादव हे कलाकार देखील 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. मराठमोळी समीर विद्वांस या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे.
संबंधित बातम्या