Karisma Kapoor : सासऱ्यांमुळे मोडला करिश्माचा संसार? 13 वर्षांचा संसार मोडण्यामागचं अभिनेत्रीने सांगितलं खरं कारण
Karisma Kapoor : करिश्मा आणि संजय यांचं 13 वर्षांचं नातं मोडलंय. याविषयी अभिनेत्रीने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

Karisma Kapoor : करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि संजय कपूर यांचं लग्न हे बॉलीवूडमधील सर्वात वादग्रस्त राहिलेलं लग्न आहे. त्यांनी लग्नाच्या 13 वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा ते विभक्त होत होते, तेव्हा अनेक आरोप प्रत्यारोप झालेत. आतापर्यंत बॉलीवूडमध्ये अनेक लग्न मोडली आहेत, त्यामध्ये अनेक आरोपही झालेत. त्यातीलच एक करिश्माचं लग्न आहे.
करिश्माच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान अनेक आरोप केले जात होते. त्याचप्रमाणे मुलांच्या कस्टडीवरुनही अनेक वाद झालेत. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया देखील चांगलीच चर्चेत होती. रिपोर्ट्सनुसार, करिश्माने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये खुलासा केला आहे की, संजयने तिचा मानसिक आणि शारिरीक छळ केला.
'माझ्या आईला त्यांनी रडवलं'
दरम्यान घटस्फोटाच्या वेळी करण्यात आलेल्या आरोपांमध्ये करिश्माने म्हटलं होतं की, आमच्या लग्नापूर्वीच संजयच्या वडिलांनी माझ्या आईला रडवलं होतं. तेव्हाच मी म्हटलं होतं की, जर त्याचा कुटुंब महिलांसोबत आताच असा व्यवहार करत असेल तर पुढे जाऊन काय करेल. त्यामुळे करिश्माने लग्नाला देखील नकार दिल्याचं तिनं म्हटलं होतं.
'फसवून लग्नासाठी तयार केलं'
करिश्माने असंही म्हटलं होतं की, मला फार वाईट वाटतं की मी त्यावेळी नीट समजू शकले नाही. संजय आणि त्याच्या कुटुंबाने फसवून मला लग्नासाठी तयार केलं होतं. त्याच्याआधी रणधीर कपूर यांनी संजयच्या वडिलांवरचा राग देखील व्यक्त केला होता. एकदा रणधीर कपूर यांनी संजयच्या वडिलांना थर्डक्लास म्हटलं होतं.
नवऱ्याबाबत करिश्माचा धक्कादायक खुलासा
झूम टिव्हीच्या रिपोर्टनुसार, करिश्माने त्यांच्या हनीमूनचा एखादा प्रसंग सांगितला आहे. हनीमूनच्या दिवशी संजयने मला त्याच्या एका मित्रासोबत झोपायला लावलं. मी नकार दिल्यानंतर त्याने मला मारहाण केली. त्यानंतर त्याने माझ्यावर प्राईस टॅग लावून एका मित्रासमोर माझा लिलाव केला. त्याचप्रमाणे संजय आर्थिक गोष्टींमध्ये त्रास दिल्याचा खुलासा कंगनाने केला आहे. पण यावर संजयने करिश्माने केवळ त्याच्याशी पैशांसाठी लग्न केलं असल्याचा खुलासा केला आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
