Gaurav More : 'गौऱ्या'साठी अभिनयची कमेंट, नेटकऱ्याकडून ट्रोल; गौरव मोरेने चांगलच झापलं म्हणाला, 'कुणाशी बोलतोय...'
Gaurav More : गौरव मोरेच्या पोस्टवर अभिनयने कमेंट केली. त्यावर एका नेटकऱ्याने त्याला ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं आहे.
Gaurav More : अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) याने काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) कार्यक्रम सोडला असल्याची पोस्ट त्याच्या सोशल मीडियावर (Social Media) केली होती. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत गौरवला शुभेच्छा देखील दिल्या. गौरव हा आता सोनी टिव्हीवरील मॅडनेसे मचाऐंगे या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हास्यजत्रा सोडताना गौरव मोरेने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं. पण याखाली आलेल्या एक कमेंटमुळे विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
गौरवच्या पोस्टवर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आणि अभिनेता अभिनय बेर्डेने कमेंट केली. त्यावर एका नेटकऱ्याने अभिनयला ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं. त्याला गौरवनेही जशास तसं उत्तर दिलं. त्यामुळे गौरवच्या पोस्टवरील या कमेंटची जोरदार चर्चा सुरु झाली. दरम्यान गौरवने हास्यजत्रा सोडल्यामुळे त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पण त्याचबरोबर त्याला अनेकांनी त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. अभियन आणि गौरवने बॉईज-4 या सिनेमात एकत्र काम केलं आहे.
नेमकं घडलंय काय?
गौरवच्या पोस्टवर अभिनयने त्याला ऑल द बेस्ट गौऱ्या... लव्ह यु अशा कमेंट केली. त्यावर गौरवनेही त्याचे आभार मानले. पण एका नेटकऱ्याने अभिनयला ट्रोल केलं. त्याने म्हटलं की, अरे गौरव एक आर्ट कलाकार आहे आणि तू एक फार्ट कलाकार आहेस. गौरव दादा किंवा सर म्हणायचे कष्ट घे. यावर अभिनयने त्याला उत्तर देत म्हटलं की, विनोदाचा प्रयत्न खूप चांगला होता, पण गौरव आर्ट कलाकार नाही तर ऑलराऊंडर कलाकार आहे. यानंतर गौरवनेही त्या नेटकऱ्याला चांगलच सुनावलं. गौरवने म्हटलं की, आपण कुणाशी बोलतोय याचं जरा भान ठेवा, अभिनय बेर्डे हे एक प्रतिष्ठित नाव आहे त्यामुळे जरा जपून बोला.
पुढे या नेटकऱ्याने गौरवला म्हटलं की, तुमचा अभिनय मी तुम्हाला मिशी फुटत असल्यापासून बघतोय. एकांकिका नाटकं वैगरे. तुमच्यापेक्षा वय आणि कारकिर्दीने लहान असलेल्या नवोदित अभिनेत्याने एकेरी आणि उद्धट हाक मारावी हे योग्य नाही. प्रतिष्ठित अभिनेता होण्यासाठी कोणत्याही लेबल आणि गॉडफादरशिवाय तुम्ही कष्ट घेतले आहेत. पुढे त्या नेटकऱ्याने अभिनयला म्हटलं की, हा विनोदाचा प्रयत्न अजिबात नव्हता. माझा मुद्दा आदर हा आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपण पाहतो की ते कलाकारांसाना कसा रिस्पेक्ट देतात ते.