एक्स्प्लोर
भावाच्या लग्नात बहिणींचा थाट! सिद्धार्थच्या हळदीत प्रियांका अन् मनारा चोप्रा सजल्या; खास फोटो पाहिलेत का?
सिद्धार्थ चोप्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याआधी हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रियांका चोप्रा सहभागी झाली होती.
priyanka chopra and mannara chopra
1/7

Siddharth Chopra Mehandi: सध्या प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नाची सगळीकडे चर्चा आहे. लवकरच तो विवाहबंधनात अडकणार असून त्याआधी त्याच्या हळदी समारंभ पार पडत आहे.
2/7

या समारंभाला प्रियांका चोप्रा भारतात परतली आहे. या कार्यक्रमात सर्व चोप्रा कुटुंबीय सहभागी झाले आहेत. सिद्धार्थ चोप्रा हा नीलम अपाध्याय हिच्याशी लग्न करत आहे. नीलम एक अभिनेत्री आहे. या सोहळ्यासाठी बिग बॉस 17 फेम तसेच प्रियांका चोप्राची चुलत बहीण मनारा चोप्रा हीदेखील आली आहे. ती मेहंदी सेरेमनीमध्ये बहीण मिताली हांडा हिच्यासोबत सामील झाली होती.
3/7

सिद्धार्थ चोप्राच्या हळदी समारंभात अनेकांनी उत्साहात सहभाग घेतला आहे. लवकरच तो लग्नबंधनात अडकणार आहे.
4/7

कपड्यांना मॅच करणारे अइररिंग त्यांनी परिधान केले आहेत. सोबतच हातात स्मार्टवाच, बोटांत अंगठी आणि सोबत एक मिनी पर्स घेऊन त्या या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत.
5/7

प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यादेखील गुलाबी रंगाच्या सुटमध्ये दिसत आहेत. त्यांनी महागडे दागिने परिधान केले आहेत.
6/7

मिताली हांडानेही पिवळ्या रंगाचे आकर्षक कपडे परिधान केले आहेत. वन शोल्डर ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य चांगलंच खुललेलं दिसत आहे.
7/7

मनाराने या कार्यक्रमासाठी मल्टिकलर गाऊन परिधान खेला आहे. सोबतच गाऊवर तिने केशरी रंगाची ओढणी घेतली आहे. सोबतच तिने मॅचिंग एअररिंग घालत आपला लूक पूर्ण केला आहे.
Published at : 05 Feb 2025 09:21 PM (IST)
आणखी पाहा























