Lokesh Kanagaraj : ‘विक्रम’नंतर त्याचा सिक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीला येणार? दिग्दर्शक लोकेश कनगराजने वाढवली चाहत्यांची उत्सुकता!
Lokesh Kanagaraj : 'विक्रम' हा संपूर्ण पॅन इंडिया चित्रपट असून तो तामिळ, हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Lokesh Kanagaraj : साउथ दिग्दर्शक लोकेश कनगराजचा (Lokesh Kanagaraj) बहुचर्चित ‘विक्रम’ (Vikram) आज (3 जून) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'विक्रम' हा संपूर्ण पॅन इंडिया चित्रपट असून तो तामिळ, हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एक मल्टिस्टारर असल्यामुळे या चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. या चित्रपटात कमल हासन, फहाद फासिल आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
यापूर्वी अशी चर्चा रंगली होती की, कमल हासन 'विक्रम' या चित्रपटाच्या सिक्वेलची निर्मिती करत आहे, ज्यात अभिनेता सुर्या मुख्य भूमिकेत असेल. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आजे की, लोकेश कनगराज लवकरच एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे ज्यात कमल हासन प्रमुख भूमिकेत दिसणार असून, सुर्या, कार्ती हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुर्याच्या कॅमिओ भूमिकेबरोबरच, 'विक्रम'च्या क्लायमॅक्समध्ये कार्तीच्या व्हॉईस ओव्हर नेरेशनने लोकेश कनगराजच्या पुढच्या चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे.
कमल हासन यांनी दिले संकेत
सध्या, लोकेश विजयसोबत 'थलपथी 67' नंतर त्याच्या आगामी 'कैथी' चित्रपटाच्या सिक्वेलवर लक्ष केंद्रित करणार आहे, ज्यात कार्ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आगामी चित्रपट देखील ‘विक्रम’ प्रमाणेच एक मल्टीस्टारर चित्रपट असेल आणि कार्ती, सूर्या आणि कमल हासन या चित्रपटात एकत्र काम करतील. 'विक्रम' ट्रेलर लॉन्चमध्ये कमल हासन यांनी आधीच जाहीर केले होते की, ते लोकेश कनगराजसोबत पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे. मात्र, त्याबाबत अधिकृत घोषणेची अद्याप प्रतीक्षा आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘विक्रम’ची क्रेझ!
'विक्रम' चित्रपटात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी म्हटले की, कमल हासनचा 'विक्रम' चित्रपट रिलीजआधीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. 'विक्रम' चित्रपटाचे बजेट 150 कोटी होते. या चित्रपटाने रिलीजआधीच 204 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे रिलीजआधीच निर्मात्यांना नफा मिळाला आहे. चित्रपटाने रिलीजआधीच 54 कोटींचा नफा केला आहे. रिलीजआधीच बजेटपेक्षा अधिक कमाई करणारा कमल हासन यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
संबंधित बातम्या