Jui Gadkari : जुई गडकरीची पोस्ट चर्चेत; गंभीर आजाराबद्दल दिली माहिती
Jui Gadkari : महिला दिनानिमित्त जुईनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
Jui Gadkari : मराठी बिग बॉस (Bigg Boss Marathi) या कार्यक्रमामुळे अभिनेत्री जुई गडकरीला (Jui Gadkari) विशेष लोकप्रियता मिळाली. जुईच्या पुढचं पाऊल या मालिकेतील जुईच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. जुई ही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. तिने नुकतीच एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना तिला झालेल्या गंभीर आजाराबाबत सांगितले आहे.
महिला दिनानिमित्त जुईनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. जुईनं तिचाफोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती जांभळ्या रंगाची साडी अन् मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे. 'वो स्त्री है! कुछ भी कर सकती है!!' असं कॅप्शनमध्ये लिहून जुईनं तिला झालेल्या गंभीर आजाराबाबतची माहिती चाहत्यांना दिली.
जुईनं पोस्टमध्ये मणक्यासंबंधित झालेल्या आजाराबाबात तसेच लॉकडाऊनमधील तिनं केलेल्या कामांबद्दल सांगितले आहे. पोस्टच्या शेवटी जुईनं चाहत्यांना खास संदेश दिला आहे. तिनं लिहिले, 'स्त्री ही strong असतेच!' तसेच जुईनं पोस्टमध्ये, 'आज तुमच्याशी मनातली एक गोष्टं शेअर करणारे!' असंही लिहिले आहे.
जुईची पोस्ट-
जुईच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. काहींनी कमेंट करून जुईचं कौतुक देखील केलं आहे. जुई सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोला देखील चाहत्यांची पसंती मिळते.
महत्वाच्या बातम्या
- Rupa Dutta : अभिनेत्रीनं चक्क पाकिट मारलं, पोलिसांनी केली अटक
- Kangana Ranaut On The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' सिनेमावर 'पंगा क्वीन'ने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन राज्यांत करमुक्त
- Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' आता ओटीटीवर पाहता येणार; पाहा कोणत्या अॅपवर, कधी रिलीज होणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha