The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन राज्यांत करमुक्त
The Kashmir Files : मध्य प्रदेश, हरियाणानंतर आता गुजरात सरकारनेदेखील 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा करमुक्त केला आहे.
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. मध्य प्रदेश, हरियाणानंतर आता गुजरात सरकारनेदेखील 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा करमुक्त केला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.
Gujarat makes the film The Kashmir Files tax-free in the State: Chief Minister's Office
— ANI (@ANI) March 13, 2022
गुजरात सरकारने सिनेमा करमुक्त केल्याने विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत गुजरात सरकारचे आभार मानले आहेत. या सिनेमाचे जगभरातून कौतुक होत आहे. सिनेमा पाहताना प्रेक्षकदेखील भावूक होत आहेत. काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार आणि आजच्या तरुणांच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
View this post on Instagram
दुसऱ्या दिवशी केली दुप्पट कमाई
पहिल्या दिवशी 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाने 3.55 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 8.50 कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसात या सिनेमाने 2.05 कोटींची कमाई केली आहे.
संबंधित बातम्या
Movies On Tv : सिनेमागृहानंतर छोट्या पडद्यावरदेखील 'हे' सिनेमे आमने-सामने
Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' आता ओटीटीवर पाहता येणार; पाहा कोणत्या अॅपवर, कधी रिलीज होणार
Bhuban Badyakar : ‘खूप चुकलो! आता पुन्हा शेंगदाणे विकेन’, ‘कच्चा बदाम’ फेम गायक भुवन बड्याकरला झाली उपरती!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha