(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Grammy 2022 : संगीतकार रिकी केजने जागवल्या भारतीयांच्या आशा, 'डिव्हाईन टाइड्स'साठी मिळालं नामांकन!
Ricky Cage : भारतीय संगीतकार रिकी केज (Ricky Kej) यांना त्यांच्या 'डिव्हाईन टाइड्स' (Divine Tides) या अल्बमसाठी 64व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारांत नामांकन मिळाले आहे.
Ricky Cage : संगीत उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार, ‘ग्रॅमी अवॉर्ड्स 2022’ची (Grammy 2022) सुरुवात झाली आहे. यावेळी नामांकनं देखील समोर आली. भारतीय संगीतकार रिकी केज (Ricky Kej) यांना त्यांच्या 'डिव्हाईन टाइड्स' (Divine Tides) या अल्बमसाठी 64व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारांत नामांकन मिळाले आहे. रिकी केजने याआधीही ग्रॅमी अवॉर्ड जिंकला आहे. ज्या अल्बमसाठी रिकीला नामांकन देण्यात आले आहे, तो त्यांनी ब्रिटीश रॉक ग्रुप 'द पोलिस' च्या संस्थापक आणि ड्रमरने रॉक-लिजेंड स्टीवर्ट कोपलँडसह तयार केला आहे. या अल्बमचा निर्माता देखील एक भारतीय आहे.
64वा वार्षिक ग्रॅमी पुरस्कार संगीत उद्योगातील बड्या दिग्गजांना दिला जाईल. या यादीत एका भारतीयाच्या नावामुळे भारताच्या खात्यात ग्रॅमी येण्याची आशाही वाढली आहे. रिकी केजने 2015 मध्येही हा पुरस्कार पटकावला आहे. 'विंड्स ऑफ संसार' या अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला. इतकेच नाही, तर त्या वेळी यूएस बिलबोर्ड न्यू एज अल्बम चार्टवरही या अल्बमने पहिले स्थान पटकावले होते. या चार्टवर पदार्पण करणारे रिकी पहिले भारतीय ठरले होते.
रिकी केजच्या नावावर सर्वात तरुण भारतीय म्हणून ग्रॅमी पुरस्कार जिंकण्याचा विक्रम आहे. रिकी व्यतिरिक्त 3 भारतीयांनीही हा पुरस्कार जिंकला आहे. यामध्ये एआर रहमान, रविशंकर, झाकीर हुसेन यांच्या नावांचा समावेश आहे. ग्रॅमी पुरस्कारासाठी पुन्हा नामांकन मिळाल्याबद्दल, रिकी म्हणाले की, ‘डिव्हाईन टाइड्स'साठी दुसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझे संगीत क्रॉस कल्चर असेल, पण त्याची मुळे नेहमीच भारताशी जोडलेली आहेत. हे नामांकन मला माझा संगीत प्रवास सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करते. यासाठी मी माझ्या टीमचा आणि रेकॉर्डिंग अकादमीचा आभारी आहे.’
हेही वाचा :
- Prithviraj : मानुषी छिल्लरने 'पृथ्वीराज'च्या सेटवरचा फोटो केला शेअर, राजकुमारी संयोगिताचा रॉयल लूक
- Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, जाणून घ्या भारतात कधी आणि कुठे पाहता येणार
- Filmfare Awads Marathi 2021 : आज प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रंगणार 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळा'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha