Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, कुणी कुणी कोरलं पुरस्कारावर नाव? जाणून घ्या...
जगभरात ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) मानाचा मानला जातो. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. आज 3 एप्रिलला लॉस वेगसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडतो आहे.
LIVE
![Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, कुणी कुणी कोरलं पुरस्कारावर नाव? जाणून घ्या... Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, कुणी कुणी कोरलं पुरस्कारावर नाव? जाणून घ्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/04/6fc0b06d01020096ce674288edb94827_original.jpg)
Background
Grammy Awards 2022 : जगभरात ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) मानाचा मानला जातो. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. आज 3 एप्रिलला लॉस वेगसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडतो आहे. या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. मानाचा पुरस्कार कोण पटकावणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
ग्रॅमी पुरस्कार सोहळा भारतीयांना कधी पाहता येणार?
64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा आज 3 एप्रिलला लॉस वेगसमध्ये पार पडतो आहे. या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग भारतीय प्रेक्षकांना 4 एप्रिलला सकाळी 5:30 वाजल्यापासून पाहायला मिळणार आहे. हा सोहळा प्रेक्षक Sony Liv या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. पॉप बँड BTS ग्रॅमी अवॉर्ड्सच्या मंचावर थिरकणार आहे. या गटाला ग्रॅमी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले आहे. याशिवाय गागा, ब्रँडी कार्ली, जस्टिन बीबर, सिल्क सोनिकसह अनेक कलाकार परफॉर्म करणार आहेत.
Grammy Awards 2022 : 'WE ARE' ठरला 'अल्बम ऑफ द इयर'
'WE ARE' ठरला 'अल्बम ऑफ द इयर'
👏 @JonBatiste's 'WE ARE' wins the GRAMMY for Album Of The Year at the 2022 #GRAMMYs. https://t.co/gD7P5Z1HRp
— Recording Academy / GRAMMYs (@RecordingAcad) April 4, 2022
पुन्हा उंचवली भारतीयांची मान, रिकी केजला 'सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम' श्रेणीमध्ये पुरस्कार!
भारतीय गायक रिकी केजला 'सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम' श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाला आहे. रिकी केजने ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याबद्दल ट्विटद्वारे आनंद व्यक्त केला.
Won the Grammy Award today for our album Divine Tides 🙂 Filled with gratitude and love this living-legend standing with me - @copelandmusic . My 2nd Grammy and Stewart's 6th. Thank you to everyone who ever collaborated, hired, or listened to my music. I exist because of you. pic.twitter.com/Pe4rkOp0ba
— Ricky Kej (@rickykej) April 4, 2022
फॅशनचा जलवा!
'ग्रॅमी'च्या रेड कार्पेटवर फॅशनचा जलवा!
Check out the effortless style on this year's #GRAMMYs Red Carpet, presented by @GreyGoose. ✨ #GGXGRAMMYs pic.twitter.com/gO5eX5tfNC
— Recording Academy / GRAMMYs (@RecordingAcad) April 4, 2022
'वी आर'ला 'अल्बम ऑफ द इयर'चा पुरस्कार!
Congratulations Album Of The Year Winner - ‘We Are’ @JonBatiste #GRAMMYs pic.twitter.com/UJPztlDWy9
— Recording Academy / GRAMMYs (@RecordingAcad) April 4, 2022
'लीव्ह द डोर ओपन'ला 'रेकॉर्ड ऑफ द इयर'चा ग्रॅमी!
सिल्क सोनिकच्या 'लीव्ह द डोर ओपन'ला 'रेकॉर्ड ऑफ द इयर'चा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.
Congrats Record Of The Year Winner - “Leave The Door Open” @silksonic @BrunoMars @AndersonPaak ✨ #GRAMMYs https://t.co/0D6iC8OYJM pic.twitter.com/RTT1XLDX3J
— Recording Academy / GRAMMYs (@RecordingAcad) April 4, 2022
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)