'रात्री ठीक होते पण सकाळी..', बॉलिवूड गायक- अभिनेत्याच्या मृत्यूनंतर कुटुंब नेमकं काय म्हणाले? पोलिसांनी सांगितले की...
Singer and Actor Prashant Tamang Dies: इंडियन आयडॉल 3 चे विजेते प्रशांत तमांग यांचे वयाच्या 43 व्या वर्षी निधन. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची घेण्यात आली प्रतिक्रिया.

Singer and Actor Prashant Tamang Dies: गायक - अभिनेता आणि इंडियन आयडॉल 3 चे विजेता प्रशांत तमांग (Prashant Tamang) यांचे निधन झाले. वयाच्या 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी त्यांच्या मृत्यूची बातमी पसरताच चाहत्यांना मोठा धक्काच बसला. प्रशांत तमांग यांचा घरातच मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, कुटुंबाने कोणत्याही गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारली आहे. कुटुंबाने असेही सांगितले की, काल रात्री दिल्लीतील निवासस्थानी झोपले होते. परंतु, रविवारी सकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाली. प्रशांत तमांग यांच्या अकाली निधनानंतर सिनेसृष्टीत अनेकांना धक्काच बसला.
View this post on Instagram
प्रशांत तमांग यांचे जवळचे मित्र, गायक महेश सेवा यांनी सांगितले की, "प्रशांत तमांग यांचा मृतदेह दिल्लीतील (जनकपूरी) निवासस्थानी आढळला. सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कुटुंब त्यांना रूग्णालयात घेऊन गेले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अकाली निधनाने मला जबरदस्त धक्का बसला. मी काही दिवसांपूर्वी त्यांच्या बोललो होतो. तेव्हा ते पूर्णपणे निरोगी होते", असे महेश सेवा म्हणाले.
या प्रकरणात पोलीस नेमकं काय म्हणाले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत तमांग यांना त्यांच्या पत्नीने माता चानन देवी रूग्णालयात नेले होते. डॉक्टरांनी तपासून प्रशांत तमांग यांना मृत घोषित केले. कुटुंब आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. कुटुंबाने म्हटले की, त्यांना कोणत्याही प्रकारचा घातपाताचा संशय नाही. प्रशांत आदल्या दिवशी चांगले झोपले होते. मात्र, सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला.
वडील वारले आणि शाळा सोडली
प्रशांत तमांग यांचा जन्म 4 जानेवारी 1983 रोजी अरूणाचल प्रदेश येथील दार्जिलिंगमध्ये झाला. एका नेपाळी भाषिक गोरखा कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील पश्चिम बंगाल पोलीसात होते. दरम्यान, सेवा बजावत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यानंतर प्रशांत यांनी वडिलांचे पद स्वीकारण्यासाठी शाळा सोडली.
इंडियन आयडॉलपर्यंत कसा पोहोचला?
मित्रांच्या प्रोत्साहनामुळे, त्याने 2007मध्ये इंडियन आयडॉलसाठी ऑडिशन दिले होते. इंडियन आयडॉल 3 चा विजेता झाला. त्यानंतर 2010 मध्ये त्याने त्याचा पहिला अल्बम काढला. त्याने अभिनय क्षेत्रातही उत्तम कामगिरी केली. त्याचा शेवटचा चित्रपट सलमान खानचा बॅटल ऑफ गलवान ठरला. हा चित्रपट 17 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
























