एक्स्प्लोर

Hawahawai : ‘हवाहवाई’ चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज!

Hawahawai : स्वयंपाकघरात टिफिन हातात घेऊन उभं असलेलं जोडपं या मोशन पोस्टरमध्ये दिसत आहे.

Hawahawai : ‘द ग्रेट इंडियन किचन’ यासारख्या बहुचर्चित, तसेच अनेक मल्याळम सिनेमातून आपल्या सशक्त अभिनयाचं दर्शन घडवलेली अभिनेत्री निमिषा सजयन (Nimisha Sajayan) आता ‘हवाहवाई’ (Hawahawai) या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘हवाहवाई’ हा चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून, चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले असून, अभिनेत्री निमिषा सजयन आणि अभिनेता विजय आंदळकर (Vijay Andalkar) ही फ्रेश जोडी याचित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

स्वयंपाकघरात टिफिन हातात घेऊन उभं असलेलं जोडपं या मोशन पोस्टरमध्ये दिसत आहे. महेश टिळेकर यांच्या आधीच्या ‘वन रूम किचन’ या मराठी सिनेमा सारखा ‘हवाहवाई’ हा सुद्धा कौटुंबिक चित्रपट असणार आहे, असा अंदाज बांधता येतो. चित्रपटातील बाकी कलाकार कोण? कथा काय असणार? अशा प्रश्नांची उत्तरंही लवकरच मिळणार आहेत. मात्र, मोशन पोस्टरमुळे आता 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे.

पाहा मोशन पोस्टर :

‘या’मुळे ‘हवाहवाई’ चित्रपट चर्चेत!

मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे ‘हवाहवाई’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 88व्या वर्षी या चित्रपटातलं उडत्या चालीचं एक गाणं गायलं आहे. निमिषा सजयन पदार्पण, आशा भोसले यांचं गाणं यामुळे ‘हवाहवाई’ हा चित्रपट चर्चेत आहे. अक्षयकुमार, जयाप्रदा, हेलन या हिंदी कलाकारांनी महेश टिळेकर यांच्याच चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यात आता निमिषा सजयन या नावाचीही भर पडत आहे.

‘हवाहवाई’ या चित्रपटातील भूमिका तिला साजेशी असल्यानं निमिषाला मराठीत पहिला ब्रेक देण्याचं ठरवलं, असं  महेश टिळेकर यांनी सांगितलं. साऊथचे चित्रपट इतर भाषेत भाषांतरीत होऊन प्रदर्शित होत असताना, साऊथ मधील उत्तम अभिनय करणाऱ्या कलाकारांना मराठी चित्रपटात आणण्याचा नवा ट्रेण्ड महेश टिळेकर यांनी हवाहवाई सिनेमातून सुरू केला आहे. निमिषा सजयनसह मराठीतील काही प्रसिद्ध कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका असून, अनेक नवीन कलाकारांनाही या चित्रपटात संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा :

वयाच्या 88व्या वर्षी सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायलं 'हवाहवाई' चित्रपटासाठी गाणं!

Nimisha Sajayan : 'द ग्रेट इंडियन किचन'  फेम निमिषा सजयनची मराठीत एण्ट्री, ‘हवाहवाई’त दाखवणार अभिनयाचा जलवा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nira Canal : नीरा उजवा कालव्यात मृत कोंबड्या आढळल्यानं खळबळ,सावधगिरी बाळगण्याचं रामराजेंचं आवाहनABP Majha Headlines : 8 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 08 March 2025 : Maharashtra News : ABP MajhaSantosh Deshmukh Case : देशमुख हत्या प्रकरणात 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब ठरले महत्त्वाचेABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : Maharashtra News : 08 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Embed widget