एक्स्प्लोर

Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला

Govinda injured misfire: रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून गोविंदा चुकून जखमी झाला होता. त्यांच्या पायात गोळी शिरली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा हे मंगळवारी पहाटे त्यांच्याच पिस्तुलामधून सुटलेली गोळी लागू जखमी झाले होते. गोळी लागल्यानंतर गोविंदा यांना रक्तबंबाळ अवस्थेत जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करुन गुडघ्यात शिरलेली गोळी बाहेर काढण्यात आली. त्यानंतर गोविंदा (Actor Govinda) यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, गोविंदा यांच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी नेमकी (Gun firing) कशी सुटली, याविषयी अनेकांना प्रश्न पडला होता. त्याचे कारण आता समोर आले आहे. पोलिसांनी गोविंदा यांच्याकडी पिस्तुल ताब्यात घेतले होते. त्याची तपासणी केल्यानंतर गोविंद यांच्या रिव्हॉल्व्हरच्या लॉकचा लहानसा भाग तुटल्याचे दिसून आले. याच कारणामुळे गोविंदा यांच्या पिस्तुलातून अचानक गोळी सुटली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, गोविंदा हे मंगळवारी पहाटे 5:45 वाजताच्या विमानाने कोलकाता येथे जाणार होते. त्यासाठी ते साडेचार वाजता तयार होऊन घरातून बाहेर पडणार होते. गोविंदा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडली तेव्हा जुहू येथील घरात त्यांच्यासोबत मुंबई पोलिसांकडून पुरवण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांपैकी एकजण उपस्थित होता. गोविंदा पहाटे घराबाहेर पडत होते तेव्हा ते त्यांच्या कपाटात एक सुटकेस ठेवत होते. तेव्हा कपाटातील रिव्हॉल्व्हर खाली पडली आणि त्याच्यातून गोळी सुटली. 

गोविंदा यांच्या पायाला गोळी लागल्यानंतर त्यांच्या सुरक्षारक्षकाने त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि पोलीस कंट्रोल रुमला घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. आतापर्यंतच्या पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गोविंदा यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमध्ये एकूण सहा गोळ्या होत्या. ही बंदूक लोड करुन ठेवण्यात आली होती. पोलिसांनी बंदुकीचा परवाना तपासून पाहिला, तो वैध आहे. ही रिव्हॉल्व्हर खूप जुनी आहे. गोविंदा यांना नवीन रिव्हॉल्व्हर विकत घ्यायची होती. मात्र, त्यापूर्वीच हा अपघात झाला.

लहानशा गोष्टीमुळे घात झाला

पोलिसांनी सकाळीच गोविंदा यांच्या घरातून रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतले होते. तेव्हा या रिव्हॉल्व्हरमध्ये पाच गोळ्या होत्या, एक गोळी गोविंदा यांच्या पायात घुसली होती. ही रिव्हॉल्व्हर जुनी झाल्यामुळे गन लॉक करण्याचा छोटासा भाग तुटला होता. त्यामुळे गन लॉक होत नव्हती. त्यामुळेच कपाटात ठेवताना पिस्तुल खाली पडली तेव्हा त्याच्यातील गोळी अचानक सुटली, असा निष्कर्ष प्राथमिक तपासातून निघाला आहे. 

गोविंदा यांच्यावर दीड तास शस्त्रक्रिया

गोविंदा यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर अग्रवाल यांनी काहीवेळापूर्वीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, पहाटे पाच वाजता गोविंदा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दीड तास शस्त्रक्रिया करुन त्यांच्या गुडघ्याच्या वरील भागातून गोळी बाहेर काढण्यात आली. गोविंदा यांना आठ ते दहा टाके पडले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून दोन-तीन दिवसांमध्ये त्यांना घरी सोडण्यात येईल.

आणखी वाचा

अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGovinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Embed widget