एक्स्प्लोर

Farhan Shibani Wedding: ना लग्न ना निकाह, ‘या’ खास पद्धतीने फरहान-शिबानी बांधणार साताजन्माची गाठ!

अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, हे जोडपे मुस्लिम पद्धतीने ‘निकाह’ करणार आहेत, तर काहींनी ते महाराष्ट्रीयन रितीरिवाजानुसार लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे.

Farhan Akhtar And Shibani Dandekar Wedding Rituals: शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आणि फरहान अख्तर (Farhan Akhtar) खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता हे ‘पॉवर कपल’ लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मेहंदी सोहळ्यासोबतच दोघांच्या लग्नाच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. फरहान आणि शिबानीच्या लग्नाबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत.

अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, हे जोडपे मुस्लिम पद्धतीने ‘निकाह’ करणार आहेत, तर काहींनी ते महाराष्ट्रीयन रितीरिवाजानुसार लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, अद्याप अधिकृतपणे काहीही उघड झालेले नाही. आता या सगळ्या चर्चांमध्ये या जोडप्याच्या लग्नाशी संबंधित एक नवीन माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर ना निकाह वाचणार आहेत आणि ना मराठी रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. त्यापेक्षा दोघांनीही आपलं लग्न वेगळ्या पद्धतीनं करावं, असा विचार केला आहे.

साधे आणि पेस्टल रंगाचे कपडे घालण्याचे आवाहन

लग्न अतिशय शांतपणे आणि साध्या पद्धतीने व्हावे, अशी शिबानी आणि फरहान दोघांचीही इच्छा आहे. नव्या रिपोर्टनुसार, शिबानी आणि फरहान दोघांनाही आपलं लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं आहे. यासाठी त्यांनी पाहुण्यांना साधे आणि पेस्टल रंगाचे कपडे घालून येण्याची विनंतीही केली आहे. फरहान आणि शिबानीला त्यांच्या वैवाहिक जीवनाची अति चर्चा होऊ नये, असे वाटते आहे.

प्रेम धार्मिक परंपरेपेक्षा वरचढ!

फरहान मुस्लिम आणि शिबानी हिंदू आहेत. यामुळेच त्यांना धार्मिक भेदभाव होऊ नये असे वाटते. निकाह किंवा लग्न याऐवजी त्यांनी एक हटके पद्धत निवडली आहे. त्यांनी आपली एकमेकांकडून असणाऱ्या इच्छा आणि अपेक्षा लिहून काढल्या आहेत. या इच्छा आता 19 फेब्रुवारीला म्हणजे त्यांच्या लग्नाच्या दिवशी ते वाचणार आहेत. शिबानी आणि फरहानला ओळखणाऱ्यांना हे चांगलंच माहीत आहे की, दोघांचं प्रेम धार्मिक परंपरेपेक्षा वरचढ आहे. यासाठी दोघांनी एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
मोठी बातमी: राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
आमच्या नादाला लागू नका, पालकमंत्रीपदावर नियुक्ती होताच संजय शिरसाट सत्तारांवर कडाडले, म्हणाले..
आमच्या नादाला लागू नका, पालकमंत्रीपदावर नियुक्ती होताच संजय शिरसाट सत्तारांवर कडाडले, म्हणाले..
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Embed widget