Entertainment News Live Updates 15 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Urfi Javed : बलात्कार, डान्सबार, कपड्यांवरुन एखाद्याला मारणं हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही; पोलीस चौकशीनंतर उर्फीचं ट्वीट
उर्फीने दुसरं ट्वीट केलं आहे,"बलात्कार, डान्सबार, कपड्यांवरुन एखाद्याला मारणं हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही. एकीकडे त्यांना हिंदू राष्ट्र हवं आहे तर दुसरीकडे महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे तालिबानी नियम लागू करायचे. हिंदू धर्म हा सर्वात जुना धर्म आहे. तो स्त्रियांच्या बाबतीत खूप उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. मग तुम्ही कोणत्या संस्कृतीबद्दल बोलत आहात?"
Makar Sankranti 2023 : Shilpa Shetty ते Arjun Kapoor; सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
Celebs Wishes Makar Sankranti : मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti 2023) सण देशभरात धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. शिल्पा शेट्टीपासून (Shilpa Shetty) अर्जुन कपूरपर्यंत (Arjun Kapoor) अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Mazhi Tuzhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
Mazhi Tuzhi Reshimgath Marathi Serial : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत मागे पडली असून आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
Ghar Bandook Biryani: 'आशेच्या भांगेची नशा भारी...'; नागराज मंजुळेंच्या 'घर, बंदूक, बिरयानी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. लवकरच त्याचा 'घर, बंदूक, बिरयानी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकतंच नागराजनं या चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. या पोस्टरला त्यानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
Makar Sankranti 2023 : महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरच्या लेकीनं दिल्या मकरसंक्रांतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा
Makar Sankranti 2023 : आज देशभरात मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti 2023) सण साजरा होत आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत. पण या सगळ्यात दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या (Mahesh Babu) लेकीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
View this post on Instagram
Bamboo : अभिनय बेर्डेच्या 'बांबू' या सिनेमाचा ट्रेलर आऊट
Bamboo Trailer Out : आपल्या आजुबाजुला असा एकतरी मित्र असतो, ज्याचे प्रेमात बांबू लागलेले असतात. प्रेमातील हाच अनुभव सांगणाऱ्या 'बांबू' (Bamboo) या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
View this post on Instagram
Ketaki Chitale : केतकीने तिच्या स्टाइलने चाहत्यांना दिल्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
Ketaki Chitale Facebook Post On Makar Sankranti 2023 : मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती व्यक्त होत असते. आज मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) निमित्ताने तिने तिच्या स्टाइलने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Selfiee : खिलाडी कुमारच्या 'सेल्फी'चं मोशन पोस्टर आऊट
Akshay Kumar Emraan Hashmi Selfiee Motion Poster Out : बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारने (Akshay Kumar) नववर्षाच्या सुरुवातीला चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) निमित्ताने अक्षयने त्याच्या आगामी 'सेल्फी' (Selfiee) या सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट केलं आहे.
View this post on Instagram
Ved : भाऊ-वहिनीच्या 'Ved'चा बॉक्स ऑफिसवर डंका!
Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Movie Box Office Collection : हिंदी सिनेसृष्टीत धुमाकूळ घातल्यानंतर रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखने (Genelia Deshmukh) मराठी सिनेसृष्टीतदेखील चांगलाच धमाका केला आहे. रितेश आणि जिनिलियाचा 'वेड' (Ved) हा सिनेमा सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा 'वेड' (Ved Movie) ठरला आहे.
View this post on Instagram