ABP Majha Headlines 10 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines 10 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
राज्यात १० ऑक्टोबरनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता...हरियाणा, जम्मू काश्मीरचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच होणार महाराष्ट्राच्या निवडणुकींची घोषणा..
मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, ठाकरेंची शिवसेना १००, काँग्रेस १०० तर पवारांची राष्ट्रवादी ८४ जागा लढणार, माझाला माहिती, मित्रपक्षांना ४ जागा राखीव
जागावाटपावरून महायुतीत खटके....राऊतांचं काही ऐकत जाऊ नका, नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे वाद...तर जागा कुणामुळे वाढल्या यावरून राऊत, थोरातांमध्ये खडाजंगी...
आमदार भरत गोगावलेंची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती, मंत्रिपदाच्या अपेक्षेत असलेल्या गोगावलेंकडे एसटी महामंडळ
नांदेडचे माजी खासदार भास्करराव खतगावकरांची काँग्रेसमध्ये घरवापसी, सून मीनल खतगावकरांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश
अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर रामदास आठवलेंनीही नितेश राणेंना फटकारलं...मुस्लिम विरोधात वक्तव्यं न करण्याचा दिला सल्ला...