एक्स्प्लोर
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक हे छोट्या गोष्टींचंही फार टेन्शन घेतात. नको त्या गोष्टींचा अति विचार करुन ते डोक्याचा ताप वाढवून घेतात, त्यांना शांत करता करता समोरच्याला नाकेनऊ येतात.
Numerology Mulank 2
1/10

मूलांक 2 चे लोक छोट्या-छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतात. कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.
2/10

मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे, त्यामुळे चंद्राच्या प्रभावामुळे हे लोक साध्या मनाचे असतात. या मूलांकाचे लोक अत्यंत कल्पनाशील, भावनिक आणि दयाळू असतात.
3/10

2, 11, 20 किंवा 29 जन्मतारखेचे लोक हे ओव्हरथिंकर्स असतात. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर ते तासनतास विचार करत बसतात. कोणतीही गोष्ट यांच्या डोक्यातून सहज निघत नाही.
4/10

मूलांक 2 चे व्यक्ती पटकन शांत होत नाहीत, यांच्यासोबत राहणाऱ्या मंडळींचा अर्धा वेळ यांना शांत करण्यात जातो.
5/10

मूलांक 2 च्या व्यक्ती या फार ताण घेतात. नको त्या गोष्टींचा विचार करुन ते स्वत:चं टेन्शन वाढवतात. नको त्या गोष्टींना, व्यक्तींना महत्त्व दिल्याने त्यांची डोकेदुखी वाढते. अति ताण घेतल्याने याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होतो.
6/10

2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची थोडी कमतरता जाणवते. हे लोक लगेच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना पटकन काही बोलता येत नाही.
7/10

मूलांक 2 चे लोक स्वभावाने खूप शांत आणि सहनशील असतात. अगदी कठीण परिस्थिती जरी आली तरी हे लोक आपला संयम गमावत नाहीत.
8/10

धैर्याने परिस्थितीचा सामना करणं यांना जमतं. हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात.
9/10

2, 11, 20 किंवा 29 जन्मतारीख असलेले लोक नोकरी-व्यवसायात खूप नाव कमावतात. ते संगीत, गायन, लेखन, कला इत्यादी क्षेत्रातही चांगली कामगिरी करतात.
10/10

मृदुभाषी असल्या कारणाने या लोकांची समाजात चांगली प्रतिमा निर्माण होते. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 19 Sep 2024 02:56 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र






















