Akshaya Deodhar Makar Sankranti Special : काळी साडी, नाकात नथ, मंगळसूत्र, केसात गजरा; पाठकबाईंचा मकरसंक्रांत स्पेशल लूक पाहिलात का?
Akshaya Deodhar Hardeek Joshi : अक्षया देवधरची लग्नानंतरची ही पहिलीच संक्रांत आहे. त्यानिमित्ताने तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Akshaya Deodhar Hardeek Joshi Makar Sankranti Special Look : मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. अक्षयाची लग्नानंतरची ही पहिलीच संक्रांत आहे.
अक्षयाने (Akshaya Deodhar First Makar Sankranti) पहिल्या संक्रांतनिमित्ताने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षयाने काळ्या रंगाची काठपदराची साडी, नाकात नथ आणि गळ्यात मोत्याची माळ, मंगळसूत्र घातलं आहे. तसेच केसात गजरा माळला आहे.
अक्षयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Akshaya Deodhar Video)
अक्षयाचा मकरसंक्रांत स्पेशल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अक्षयाने लिहिलं आहे,"सुख कळले". अक्षयाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी तिला लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
अक्षयाच्या व्हिडीओवर पाठकबाई साडी खूप सुंदर आहे, भारी पाठकबाई, अंजली खूप छान दिसत आहेस, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. अक्षया आणि हार्दिक म्हणजेच पाठकबाई आणि राणा दा 2 डिसेंबर 2022 रोजी लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीची म्हणजेच राणादा आणि अंजलीबाईंच्या लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांत निमित्ताने 'होम मिनिस्टर'चा एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे. हा विशेष भाग प्रेक्षकांना 15 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या