एक्स्प्लोर

मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा

Maharashtra Assembly Election 2024 : काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. यावरून महायुतीत जुंपल्याचे दिसून येत आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामना रंगणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपावरून चर्चा सुरु आहे. त्यातच आता नाशिकमध्ये महायुतीत तणाव वाढल्याचे चित्र आहे.  

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून विविध जागांवर दावेदारी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावर (Nashik Central Assembly Constituency) दावा केला. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी थेट उमेदवाराचे नाव जाहीर केले. संजय शिरसाट यांच्या नाशिक दौऱ्यानंतर महायुतीतील मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे. 

संजय शिरसाटांकडून अजित बोरस्तेंच्या नावाची घोषणा 

संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी आयोजित केलेल्या ढोलताशा महोत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. अजय बोरस्ते आमच्यासोबत विधानसभेत दिसतील, असे त्यांनी म्हटले होते. 

भाजपचा शिवसेनेला इशारा 

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा ठोकल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच जागांवर तयारी असल्याचा इशाराच भाजपने शिवसेनेला दिला आहे. वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळे आमची सर्वच जागांवर निवडणूक लढण्याची तयारी असल्याचा दावा भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी केला आहे.

दोन्ही पक्षातील संघर्ष वाढला

संजय शिरसाट यांच्या दौऱ्यानंतर शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी नाशिक जिल्ह्यातील सात जागांवर लढण्याची तयारी असल्याचा दावा करत वादाला आणखी फोडणी दिल्यानं दोन्ही पक्षातील संघर्ष वाढला आहे. मुंबईत जागा वाटपाच्या चर्चा होत असताना नाशिकमध्ये मात्र दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देत असल्याचे चित्र आहे. 

...तर नाशिक मध्य विधानसभेतून निवडणूक लढवणार : अजय बोरस्ते 

दरम्यान, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे (Devyani Pharande) या सलग दोन टर्मपासून आमदार आहेत. मात्र संजय शिरसाट यांनी अजय बोरस्ते यांचे नाव जाहीर केले. याआधी अजय बोरस्ते हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अजय बोरस्ते यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. पक्षाने संधी दिल्यास नाशिक मध्य विधानसभेतून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे अजय बोरस्ते यांनी म्हटले होते. आता नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा

मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Embed widget