Zero Hour : युतीत आमच्या पक्षाला संधी दिली जात नाही, Ramdas Athawale यांनी व्यक्त केली नाराजी
Zero Hour : युतीत आमच्या पक्षाला संधी दिली जात नाही, Ramdas Athawale यांनी व्यक्त केली नाराजी
जागा वाटप आणि वाद हे तर ठरलेले. पण जसा मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत वादाचा विस्तव पेटलेला आहे तसाच महायुतीतही इतर नाराजीच्या ठिणग्या उडू लागल्यात .. रत्नागिरी दौऱ्यावर आलेले केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी.. आरपीआयला १० ते १२ जागा मिळाव्या हि मागणी तर केली आहेच पण त्याचबरोबर दोन बाबींबद्दल नाराजी व्यक्त केलीय ... एक आहे नितेश राणे आणि दुसरी आहे भाजप आणि मुख्यमंत्रीपद... तर दुसरीकडे काल धार्मिक द्वेष वाढवणारी वक्तव्य करणाऱ्या युतीतील बडबोल्यांवर नाराज झालेल्या अजित पवारांनंतर.. आज त्यांच्या पक्षाचे आमदार सतीश चव्हाणांनी गृहमंत्री देेवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं... तसंच नितेश राणेंच्या वक्तव्याची चौकशी करुन, कठोर कारवाईची मागणी केलीय... एकूणच महायुतीतही वातावरण सध्या तापलं असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून होणाऱ्या टीकांमुळे हा वाद तापण्याचीच शक्यता अधिक आहे...