एक्स्प्लोर

Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा

Bharat Gogavale : महाडचे आमदार भरत गोगावले यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळाचं अध्यक्ष करण्यात आलं आहे.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना आणि नेत्यांना बळ देण्याचं काम सुरु ठेवलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यासोबत असलेल्या आमदारापैकी सर्वाधिक चर्चेत असलेले आमदार म्हणून भरत गोगावले यांची ओळख आहे. भरत गोगावले यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागेल आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळेल अशी आशा होती. मात्र, विधानसभेचा कार्यकाळ संपत आला तरी भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं. अखेर, राज्य सरकारनं आज शासन निर्णय जारी करत भरत गोगावले यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. भरत गोगावले यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट, हेमंत पाटील, आनंदराव अडसूळ यांना विविध मंडळांवर नेमलं होतं. त्यावेळेपासूनच भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचं अध्यक्ष दिलं जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं असून भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचं अध्यक्ष म्हणून नेमण्यात आल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

भरत गोगावलेंकडे एसटीचं अध्यक्षपद

महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार जो परिवहन मंत्री असतो तोच एसटी महामंडळाचा अध्यक्ष असतो. त्यामुळं भरत गोगावले यांची नियुक्ती लांबणीवर पडली होती. भरत गोगावले यांनी आज दुपारी एबीपी माझासोबत बोलताना  एसटी महामंडळाबाबत आमची बोळवण केली जात आहे हा विषय नाही, असं म्हटलं होतं. हे महामंडळ आताच का दिल जातयं, या मागचं मुख्यमंत्र्यांचं कारण काय हे जाणून घेणयासाठी मुख्यमंत्र्यांना आज रात्री भेटणार असल्याचं म्हटलं होतं. एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारायचं की नाही ठरवणार असल्याचं म्हटलं होतं. 

संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा चार्ज स्वीकारला असून त्यांचा सत्कार करताना देखील भरत गोगावले यांनी एसटी महामंडळाचा चार्ज स्वीकारला नसल्याचं म्हटलं होतं. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्यानंतर मंत्रिपदासाठी भरत गोगावले आग्रही होते. भरत गोगावले यांनी रायगडचं पालकमंत्रिपद मिळावं, अशी अपेक्षा ठेवली होती.  भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी शिवलेल्या कोटाची देखील जोरदार चर्चा होत आलेली आहे. आता राज्य सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं नसलं तरी भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मात्र  देण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

Bharat Gogavale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Couple Died: बाळ होत नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या, लग्नाच्या वाढदिवशीच नवे कपडे घालून गळफास लावून घेतला
बाळ होत नसल्याने दाम्पत्याचं टोकाचं पाऊल, लग्नाच्या वाढदिवशी नवे कपडे घालून नटले अन् अखेरच्या प्रवासाला निघाले
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या 26000 घरांच्या किमती अखेर जाहीर! 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांच्या किमती, अर्ज करण्याची संधी चुकवू नका
सिडकोच्या 26000 घरांच्या किमती अखेर जाहीर! 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांच्या किमती, अर्ज करण्याची शेवटची संधी
Torres Scam : कुणी कर्ज काढून पैसे गुंतवले, लाखो मुंबईकरांची टोरेसकडून फसवणूक, पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या
आठवड्याला 11 टक्क्यांचा परतावा, झटपट श्रीमंतीचं आमिष महागात पडलं, लाखो मुंबईकरांना टोरेसनं लावला चुना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 at 7AM Superfast 08 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याBuldhana Crime News : वसतीगृह अधिक्षकाकडून 12 वर्षीय मुलावर अत्याचार, बुलढाणा येथिल घटनाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 08 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 630AM 08 January 2025 माझं गाव, माझा जिल्हा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Couple Died: बाळ होत नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या, लग्नाच्या वाढदिवशीच नवे कपडे घालून गळफास लावून घेतला
बाळ होत नसल्याने दाम्पत्याचं टोकाचं पाऊल, लग्नाच्या वाढदिवशी नवे कपडे घालून नटले अन् अखेरच्या प्रवासाला निघाले
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या 26000 घरांच्या किमती अखेर जाहीर! 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांच्या किमती, अर्ज करण्याची संधी चुकवू नका
सिडकोच्या 26000 घरांच्या किमती अखेर जाहीर! 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांच्या किमती, अर्ज करण्याची शेवटची संधी
Torres Scam : कुणी कर्ज काढून पैसे गुंतवले, लाखो मुंबईकरांची टोरेसकडून फसवणूक, पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या
आठवड्याला 11 टक्क्यांचा परतावा, झटपट श्रीमंतीचं आमिष महागात पडलं, लाखो मुंबईकरांना टोरेसनं लावला चुना
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Embed widget