एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 10 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 10 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

शाहरुख खानच्या जवान चित्रपटात झळकणार 'पुणे मेट्रो'

hahrukh Khan Pune Metro: अभिनेता शाहरुख खान याचा आगामी सिनेमा 'जवान'चा टीझर प्रदर्शित झाला. त्या टीझरमध्ये पुणे मेट्रोची झलक बघायला मिळाली. शाहरुख तुकाराम नगर या मेट्रो स्थानकावर बसलेला दिसत आहे. पुणे मेट्रोने हा व्हिडिओ शेअर करताना एक पोस्ट लिहिली आहे. त्यात लिहिलं आहे की, शाहरुख खानच्या आगामी सिनेमासाठी पुणे मेट्रोच्या संत तुकाराम नगर स्थानकाचीची झलक...' त्यामुळे आता पुणे मेट्रोचा मान वाढला आहे.

शाहरुख खान याने आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र लॉकडाऊननंतरच्या सिनेमाची सगळेच प्रेक्षक वाट पाहत आहेत. त्यात जवान सिनेमात शाहरुख खानचा वेगळा लूक बघायला मिळणार असल्याचं टीझरमधून स्पष्ट होत आहे. नेहमीच्या चौकटीच्या बाहेरची भूमिका या सिनेमात साकारणार असल्याचं समजतंय. शाहरुखच्या लूकला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे अनेक चाहते त्याच्या जवान सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

पुणे मेट्रोच्या अकाऊंटवरुन शाहरुख खानच्या जवान सिनेमाचं टीझर शेअर करण्यात आलं आहे. त्यात पुण्यातील (पिंपरी-चिंचवड) संत तुकाराम नगरच्या मेट्रो स्थानकावर वेगळ्या लूकमध्ये बसून दिसतो आहे. या व्हिडीओला पुणेकरांकडून भन्नाट प्रतिक्रियादेखील आल्या आहेत. भारताची शान शाहरुख खान, पुण्यातील सीन बघून आनंद होत आहे, अशा अनेक प्रतिक्रिया पुणेकरांनी दिल्या आहेत.

पुणे मेट्रोमध्या करामतीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते.  मेट्रो सुरु झाल्यावर त्यात भजन, नाच, गाणी, पुणेरी भांडणं याचे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. तीन दिवसात किमान सात लाख पुणेकरांनी या मेट्रोचा प्रवास केला होता. काही दिवसांपुर्वी याच मेट्रोत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमदेखील पार पडला होता. गरवारे ते वनाज हा मार्ग सध्या सुरु करण्यात आला आहे. मेट्रोच्या बाकी टप्प्यांचं काम अजून बाकी आहे. काही परिसरातून मेट्रोचा प्रवास भूयारातून होणार आहे. या सगळ्या भूयाराचं काम पूर्ण झालं आहे. स्वारगेट आणि बुधवार पेठेतील मेट्रोचा भूयारी मार्ग असणार आहे. दोन दिवसांपुर्वीत स्वारगेटस्थानकाजवळ ब्रेक थ्रु झाला. मेट्रोच्या भूयाराचा हा शेवटचा ब्रेक-थ्रु होता.

 

14:20 PM (IST)  •  10 Jun 2022

Netflix Most Watch Movies : नेटफ्लिक्सवरही बॉलिवूड चित्रपटांचा बोलबाला! टॉप 10 यादीत ‘या’ चित्रपटांचा समावेश

Netflix Most Watch Movies : कोरोना प्रकरणे आटोक्यात आल्यानंतर मनोरंजन विश्व पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ लागलं. थिएटर सुरु होताच अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र, लॉकडाऊनच्या काळात ओटीटी माध्यमांनी प्रेक्षकांचं विश्व व्यापलं असल्याने, हे चित्रपट थिएटरसोबतच ओटीटीवरही रिलीज करण्यात आले. ‘गंगूबाई काठियावाडी’पासून ते ‘आरआरआर’पर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आले आणि त्यांना प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.

नेटफ्लिक्सने नुकतीच त्यांची सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या नॉन-इंग्लिश चित्रपटांची, म्हणजेच इतर भाषिक चित्रपटांची यादी जाहीर केली. या यादीतही ‘आरआरआर’ हा बॉलिवूड चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय आणखी दोन चित्रपटांचा या यादीत समावेश आहे. पाहा कोणकोणते चित्रपटांनी या यादीत स्थान पटकावले आहे...

वाचा संपूर्ण बातमी

13:41 PM (IST)  •  10 Jun 2022

'रूप नगर के चीते' लवकरच येताहेत प्रेक्षकांच्या भेटीला

कोणत्याही शब्दांच्या चौकटीत न मावणारं नातं म्हणजे ‘मैत्री’. रक्ताच्या नात्याच्या बंधापेक्षा मैत्रीच्या नात्याचे बंध अधिक घट्ट असतात. मैत्री ... ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट एका मराठी चित्रपटातून लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नाव आहे ... 'रूप नगर के चीते'! दचकू नका..! नाव जरी हिंदी असलं तरी चित्रपट मात्र मराठी आहे. येत्या 16 सप्टेंबरला 'रूप नगर के चीते' आपल्या भेटीला येतील, त्यापूर्वी या चित्रपटाचं एक धमाकेदार पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. चिखलात माखलेले, कशाचीही पर्वा न करता, आपल्याच मस्तीत असलेले दोन जिगरी दोस्त आपल्याला त्यात दिसताहेत. ते कोण आहेत? त्याची ओळख लवकरच होणार आहे.


12:51 PM (IST)  •  10 Jun 2022

गायिका सावनी रविंद्र साऊथ इंडस्ट्री गाजवणार!

Savaniee Ravindrra : आपल्या मधाळ आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध करणारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra) हिनं तेलुगू संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'सदा नन्नु नडिपे' या तेलुगू चित्रपटामधील बरीच गाणी तिने गायली आहेत. 'सदा नन्नु नडिपे' या तेलुगू चित्रपटाचं टायटल ट्रॅक नुकतचं रिलीज झालं आहे. हे टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे. यापूर्वी सावनीने मराठी, हिंदी,  गुजराती, तमिळ, मल्याळम, कन्नडा, कोंकणी अशा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 

वाचा संपूर्ण बातमी

12:34 PM (IST)  •  10 Jun 2022

'रानबाजार'चा फायनल एपिसोड आज रिलीज होणार!

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

11:02 AM (IST)  •  10 Jun 2022

‘हा चित्रपट नाही, एक भावना आहे..’, रक्षित शेट्टीच्या ‘777 चार्ली’ची प्रेक्षकांवर जादू!

777 Charlie Twitter Review : सध्या साऊथ चित्रपट प्रेक्षकांवर जादू पसरवत आहेत. नुकताच ‘777 चार्ली’ (777 charlie) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कन्नड नायक रक्षित शेट्टीने ‘777 चार्ली’द्वारे टॉलीवूडमध्ये प्रवेश केला आहे. ‘777 चार्ली’ हा चित्रपट किरणराज के यांनी दिग्दर्शित केला आहे आणि हा एक अॅडव्हेंचर ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये रक्षित शेट्टीसोबतच लॅब्राडोर कुत्र्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा चित्रपट मूळतः कन्नडमध्ये बनवला गेला आहे आणि तामिळ, तेलुगु आणि मल्याळममध्ये डब करण्यात आला आहे.

वाचा संपूर्ण बातमी

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nasim Khan on BJP | मुस्लीम समाजाला धमक्या देणाऱ्या भाजपा नेत्यांवर कारवाई कधी करणार? -नसीम खानLaxman Hake On Darsa Melava| मी येतोय तुम्ही पण या...हाकेंचे कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्यासाठी आवाहनABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 झM 11 September 2024Job Majha : कोकण रेल्वेमध्ये नोकरीची संधी; कोणत्या पदांवर भरती? एकूण किती जागा रिक्त? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Arvind Kejriwal : फुकटातील रेवड्या अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
फुकटातील 'रेवड्या' अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
Embed widget