एक्स्प्लोर

Savaniee Ravindrra : गायिका सावनी रविंद्र साऊथ इंडस्ट्री गाजवणार! 'सदा नन्नु नडिपे' या चित्रपटाद्वारे तेलुगू संगीत क्षेत्रात पदार्पण!

Savaniee Ravindrra : आपल्या मधाळ आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध करणारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra) हिनं तेलुगू संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

Savaniee Ravindrra : आपल्या मधाळ आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध करणारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra) हिनं तेलुगू संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'सदा नन्नु नडिपे' या तेलुगू चित्रपटामधील बरीच गाणी तिने गायली आहेत. 'सदा नन्नु नडिपे' या तेलुगू चित्रपटाचं टायटल ट्रॅक नुकतचं रिलीज झालं आहे. हे टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे. यापूर्वी सावनीने मराठी, हिंदी,  गुजराती, तमिळ, मल्याळम, कन्नडा, कोंकणी अशा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 

सावनी तेलुगू संगीत क्षेत्रातील पदार्पणाविषयी सांगते, ‘मी सावनी ओरीजनल सिरीजमधून अनेक भाषेत गाणी गायली आहेत. यापूर्वी मी तेलुगू भाषेतील गाणी आणि जिंगल्स गायली होती. यावेळेस मी पहिल्यांदाच तेलुगू चित्रपटासाठी गाणी गायली आहेत. तेलुगू गाणं गाण्यासाठी मी तेलुगू भाषा शिकले. साऊथच्या कोणत्याही भाषा गाताना खूप चॅलेंजिंग असतं. या भाषा समजायला आणि बोलायला अवघड असतात. परंतु, मी याआधी तमिळ, मल्याळम गाणी गायली आहेत. ती गाणी रेकॉर्ड करण्याआधी मी साऊथमधील विविध गाणी सातत्याने ऐकली होती. त्यामुळे या चित्रपटातील तेलुगू गाणी गाताना मला थोडं सोप्पं गेलं. या गाण्यांमध्ये बऱ्यापैकी संस्कृत शब्द आहेत.’ 

मुंबईत पार पडलं रेकॉर्डिंग

तेलुगू गाण्यांच्या रेकॉर्डिंगविषयी बोलताना ती सांगते, ‘संगीत दिग्दर्शकाने हैदराबादवरून मुंबईत येऊन तब्बल दोन दिवसांत माझ्याकडून या तेलुगू चित्रपटातील सर्व गाणी रेकॉर्ड करून घेतली. त्यातील एक गाणं अरमान मलिकचं आहे. एक गाणं माझं आहे. एका गाण्यात मी आणि शुभंकरने डुएट गायले आहे. या गाण्यातील सर्व इमोशन्स, ताल, सूर यांकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिले आहे. या गाण्यांचे रेकॉर्डींग खेळीमेळीच्या वातावरणात मुंबईमध्ये पार पडले.’

मला खूप आनंद होतोय : सावनी रविंद्र

या अनुभवाविषयी बोलताना पुढे ती म्हणते की, ‘या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकचे संगीत शुभांकर याने केले आहे. तर, या चित्रपटाचा नायक आणि दिग्दर्शक प्रतिक प्रेम आहे. माझी मैत्रीण वैष्णवी पटवर्धन ही या चित्रपटाची नायिका आहे. या गाण्याचं चित्रीकरण परदेशात झालं आहे. हा चित्रपट 24 जून रोजी हैदराबादमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने माझं तेलुगू संगीत क्षेत्रात पदार्पण होत आहे. याचा मला खूप आनंद आहे.’

हेही वाचा :

Savaniee Ravindrra : गायिका सावनी रविंद्रचा मातृदिन खास, 'माँ कोई तुझसा नहीं' गाणं प्रदर्शित

Savaniee Ravindrra | माय-लेकीचा हळवा बंध, गायिका 'सावनी रविंद्र'ने लेक शार्वीसाठी गायली 'लडिवाळा’ अंगाई!

महत्त्वाच्या बातम्या

Alpha Box Office Collection: सगळ्यांनी फ्लॉप ठरवलं, पण 12 व्या दिवशी 'अल्फा'नं केला मोठा गेम; कमाईत अनपेक्षित उडी, आतापर्यंत किती कमावले?
सगळ्यांनी फ्लॉप ठरवलं, पण 12 व्या दिवशी 'अल्फा'नं केला मोठा गेम; कमाईत अनपेक्षित उडी, आतापर्यंत किती कमावले?
Aamir Khan Gauri Spratt Wedding: 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
Tejashree Pradhan Buys New Luxury Mercedes Car: तेजश्री प्रधानकडे गूड न्यूज; महिन्याभरानं पोस्ट करुन चाहत्यांना दिलं सरप्राईज, सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव
तेजश्री प्रधानकडे गूड न्यूज; महिन्याभरानं पोस्ट करुन चाहत्यांना दिलं सरप्राईज, सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव
Abhijeet Kelkar On Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंकडून धडक कारवायांचा सपाटा, मराठी अभिनेत्याची थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करत पोस्ट, केलीय मोठी मागणी...
तुकाराम मुंढेंकडून धडक कारवायांचा सपाटा, मराठी अभिनेत्याची थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करत पोस्ट, केलीय मोठी मागणी...

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Aamir Khan Gauri Spratt Wedding: 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
Sanjay Raut: रात्री जयंत पाटील-फडणवीसांची भेट, आता शरद पवारांचा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकायला पाठिंबा देण्याची चर्चा, संजय राऊत म्हणाले...
रात्री जयंत पाटील-फडणवीसांची भेट, आता शरद पवारांचा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकायला पाठिंबा देण्याची चर्चा, संजय राऊत म्हणाले...
Embed widget