एक्स्प्लोर

Netflix Most Watch Movies : नेटफ्लिक्सवरही बॉलिवूड चित्रपटांचा बोलबाला! टॉप 10 यादीत ‘या’ चित्रपटांचा समावेश

Netflix Most Watch Movies : नेटफ्लिक्सने नुकतीच त्यांची सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या नॉन-इंग्लिश चित्रपटांची, म्हणजेच इतर भाषिक चित्रपटांची यादी जाहीर केली.

Netflix Most Watch Movies : कोरोना प्रकरणे आटोक्यात आल्यानंतर मनोरंजन विश्व पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ लागलं. थिएटर सुरु होताच अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र, लॉकडाऊनच्या काळात ओटीटी माध्यमांनी प्रेक्षकांचं विश्व व्यापलं असल्याने, हे चित्रपट थिएटरसोबतच ओटीटीवरही रिलीज करण्यात आले. ‘गंगूबाई काठियावाडी’पासून ते ‘आरआरआर’पर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आले आणि त्यांना प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.

नेटफ्लिक्सने नुकतीच त्यांची सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या नॉन-इंग्लिश चित्रपटांची, म्हणजेच इतर भाषिक चित्रपटांची यादी जाहीर केली. या यादीतही ‘आरआरआर’ हा बॉलिवूड चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय आणखी दोन चित्रपटांचा या यादीत समावेश आहे. पाहा कोणकोणते चित्रपटांनी या यादीत स्थान पटकावले आहे...

आरआरआर (RRR)

‘आरआरआर’ (RRR) हा चित्रपट अजूनही चाहते आवडीने पाहत आहेत. या चित्रपटाने कलेक्शनमध्येही अनेक रेकॉर्ड केले आहेत. ‘बाहुबली’ फेम एसएस राजमौली (SS Rajamouli) दिग्दर्शित या चित्रपट राम चरण (Ram Charan), ज्युनिअर एनटीआर Jr. NTR) मुख्य भूमिकेत झळकले आहेत. तर, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले आहेत. या आठवड्यात हा चित्रपट ओटीटीवर तब्बल 13.94 मिलियन तास पाहिला गेला आहे.

टोस्काना (Toscana)

‘टोस्काना’ या चित्रपटात एक डॅनिश शेफ त्याच्या वडिलांचा बिझनेस विकण्यासाठी टस्कनीला जातो. तिथे एका स्त्रीला भेटल्यावर, त्याला जीवन आणि प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची प्रेरणा मिळते. या चित्रपटात अँडर्स मॅथिसन, क्रिस्तियाना डेलाना, अँड्रिया बॉस्का हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या आठवड्यात हा चित्रपट ओटीटीवर 5.54 मिलियन तास पाहिला गेला आहे.

F*ck Love too

‘F*ck Love too’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटामध्ये, अनेक मित्र, आपल्या अयशस्वी प्रेम जीवनाचा सामना करत आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी आणि मदतीसाठी ते एकमेकांकडे येतात. परंतु, नेहमीच त्यांच्या पदरी निराशा पडते. या चित्रपटात बो मार्टेन, गेझा वेझ, योलान्थे काबाऊ या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या आठवड्यात हा चित्रपट 4.78 मिलियन तास पाहिला गेला आहे.

द टेक डाऊन (The Takedown)

एकमेकांशी कधीच न पटणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना तब्बल एका दशकानंतर पुन्हा एकत्र येण्यास भाग पाडले जाते. या मागे कारणही तसेच आहे.  हे पोलीस फ्रेंच शहरातील एका हत्येचा तपास करतात, जिथे एक या हत्येचा कट रचला गेलेला असतो. या चित्रपटात ओमर साय, लॉरेंट लॅफिटे, इझिया हिगेलिन या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या आठवड्यात हा चित्रपट 3.67 मिलियन तास पाहिला गेला आहे.

द परफेक्ट फॅमिली (The Perfect Family)

‘द परफेक्ट फॅमिली’ हा चित्रपट नावाप्रमाणेच फॅमिली ड्रामा आहे. यात एक उच्च वर्गीय कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. एक अतिशय श्रीमंत आई आपल्या मुलाच्या होणाऱ्या पत्नीला जेव्हा पहिल्यांदा पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. तिच्या मुलाने एका गरीब घरातील मुलीला पसंत केलेले असते. या चित्रपटात बेलेन रुएडा, जोस कोरोनाडो, गोन्झालो डी कॅस्ट्रो हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या आठवड्यात हा चित्रपट 3.04 मिलियन तास पाहिला गेला आहे.

गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट अभिनित ‘गंगूबाई काठिवाडी’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला गेलेला नॉन इंग्लिश चित्रपट ठरला आहे. 25 देशांत हा चित्रपट टॉप 10 मध्ये सामील आहे. त्यामुळेच ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट जगभरातील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या आठवड्यात हा चित्रपट 2.84 मिलियन तास पाहिला गेला आहे.

लुकास नेटो इन: द व्हिलन प्लॅन (Luccas Neto em: O Plano Dos Viloes)

लुकास आणि गी या भावंडांना त्यांच्या सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. एल्फ मिझिन्होच्या दुष्ट योजनेत सर्व खलनायकांची एक टोळी एकत्र आली. लढाई जिंकण्यासाठी या दोघांना खूप धैर्याने आणि हुशारीने स्वतःचा बचाव करावा लागणार आहे. या आठवड्यात हा चित्रपट 2.49 मिलियन तास पाहिला गेला आहे.

जन गण मन (Jana Gana Mana)

महाविद्यालयीन प्राध्यापकाच्या निर्घृण हत्येनंतर विद्यार्थी संतापले आहेत. एक पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू करतो आणि एक वकील न्यायालयात न्याया मिळवण्यासाठी लढतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. साऊथचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला जात आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, सूरज वेंजारामूडू, पशुपती राज यांच्या मुख्य भूमिका आहेत. या आठवड्यात हा चित्रपट 2.23 मिलियन तास पाहिला गेला आहे.

जर्सी (Jersey)

क्रिकेट सोडल्यानंतर दहा वर्षांनंतर, एक हुशार पण निराश माजी फलंदाज राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याने पुन्हा क्रिकेट खेळावं अशी त्याच्या मुलाची ‘जर्सी’ची इच्छा असते. या बॉलिवूड चित्रपटात शाहिद कपूर, मृणाल ठाकूर, पंकज कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या आठवड्यात हा चित्रपट 2.11 मिलियन तास पाहिला गेला आहे.

फोर किंग्स (4 Kings)

‘फोर किंग्स’ हा चित्रपट एका सत्य घटनेपासून प्रेरित आहे. 90 च्या दशकातील तंत्रज्ज्ञ महाविद्यालयातील चार वेगवेगळ्या विद्यार्थ्यामधील संघर्षाच्या वास्तविक कथेवर आधारित हा चित्रपट आहे. याची कथा एकाच वेळी मैत्री आणि शत्रू निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा कसा वापर केला जाऊ शकतो, या संकल्पनेभोवती फिरते. या आठवड्यात हा चित्रपट 1.92 मिलियन तास पाहिला गेला आहे.

हेही वाचा :

Jaadugar On Netflix : जितेंद्र कुमारच्या 'जादूगर'चा फर्स्ट लूक आऊट, नेटफ्लिक्सवर होणार रिलीज

RRR Hindi On Netflix : ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसाची प्रेक्षकांना खास भेट! 

Gangubai Kathiawadi : आलियाच्या गंगूबाई काठियावाडीचा नेटफ्लिक्सवर धुमाकूळ!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget