(Source: ECI/ABP News/ABP Majha)
777 Charlie Twitter Review : ‘हा चित्रपट नाही, एक भावना आहे..’, रक्षित शेट्टीच्या ‘777 चार्ली’ची प्रेक्षकांवर जादू! वाचा नेटकरी काय म्हणतायत...
777 Charlie Twitter Review : ‘777 चार्ली’ चित्रपटामध्ये ‘धर्मा’ या व्यक्तीचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. धर्मा हा एका फॅक्टरीमध्ये काम करत असतो. धर्मा हा एकटा राहात असतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात चार्लीची एन्ट्री होते.
777 Charlie Twitter Review : सध्या साऊथ चित्रपट प्रेक्षकांवर जादू पसरवत आहेत. नुकताच ‘777 चार्ली’ (777 charlie) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कन्नड नायक रक्षित शेट्टीने ‘777 चार्ली’द्वारे टॉलीवूडमध्ये प्रवेश केला आहे. ‘777 चार्ली’ हा चित्रपट किरणराज के यांनी दिग्दर्शित केला आहे आणि हा एक अॅडव्हेंचर ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये रक्षित शेट्टीसोबतच लॅब्राडोर कुत्र्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा चित्रपट मूळतः कन्नडमध्ये बनवला गेला आहे आणि तामिळ, तेलुगु आणि मल्याळममध्ये डब करण्यात आला आहे.
‘777 चार्ली’ चित्रपटामध्ये ‘धर्मा’ या व्यक्तीचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. धर्मा हा एका फॅक्टरीमध्ये काम करत असतो. धर्मा हा एकटा राहात असतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात चार्लीची एन्ट्री होते. चार्ली हा एक लॅब्राडोर कुत्रा आहे. चार्लीची एन्ट्री झाल्यानंतर धर्माच्या आयुष्या जे काही घडते, ते या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे. चार्ली आणि धर्मामधील नाते या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे.
हा चित्रपट नाही, एक भावना आहे...
777 चार्ली हे चित्रपटाचे नाव या चित्रपटातील लॅब्राडोर कुत्र्याच्या नावावर ठेवण्यात आले आहे. या चित्रपटात संगीता शृंगेरी, राज बी शेट्टी, दानिश सैत आणि बॉबी सिम्हा यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत.
या चित्रपटाचे शुटिंग म्हैसूर, बंगळुरू, दांडेली जंगल, कोडाईकनाल, गोवा, गुजरात, राजस्थान आणि पंजाबमध्ये पार पडले आहे. चित्रपटासाठी नोबिन पॉल यांनी संगीत दिले आहे. परमवाह स्टुडिओज अंतर्गत रक्षित शेट्टी आणि जीएस गुप्ता यांनी केलेला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ‘हा चित्रपट नाही, एक भावना आहे’, असे चाहते म्हणत आहेत.
‘चार्ली’ चित्रपटाला देखील मिळणार प्रेक्षकांची पसंती
‘केजीएफ’, ‘आरआरआर’, ‘पुष्पा’ या चित्रपटांप्रमाणेच ‘चार्ली’ चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. किरण राज के यांनी या चित्रपटाचे कथानक लिहिले असून त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केलं आहे. रक्षित शेट्टीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ' आमचा अनेक वर्षांचा प्रवास आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत. 10 जून रोजी तुमच्या भोटीस आम्ही येणार आहोत. तुमचे प्रेम आम्हाला मिळेल, अशी आशा व्यक्त करतो.' रक्षितनं चार्लीसोबतचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. फोटोमधील चार्ली आणि रक्षितच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
हेही वाचा :
PHOTO : ‘नागिन’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाशबद्दल ‘या’ खास गोष्टी माहितीयेत का?
PHOTO : शुभ मंगल...SS सावधान! साऊथ अभिनेत्री नयनतारा अडकली विवाह बंधनात, पाहा फोटो