एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 08 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 08 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Khatron Ke Khiladi 13: खतरों के खिलाडीचं नवं पर्व लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Khatron Ke Khiladi 13: छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे कलाकार आता त्यांच्या आयुष्यात संकटांना सामोरे जाताना दिसणार आहेत. कर्लस टिव्हीवरील धमाकेदार कार्यक्रम 'खतरों के खिलाडी'च्या (Khatron Ke Khiladi) 13 व्या पर्वाची प्रेक्षक खूप आतूरतेने वाट बघत आहेत. तसेच या सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबद्दलची देखील उत्सुकता दिवसागणिक वाढत आहे. म्हणूनच 'खतरों के खिलाडी'बद्दलचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हांला देणार आहोत. 

Sara Ali Khan Vicky Kaushal : सारा अली खान अन् विकीचा अनटायटल्ड सिनेमा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sara Ali Khan Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि विकी कौशलचा (Vicky Kaushal) अनटायटल्ड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 2 जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं समोर आलं आहे. सारा अली खान आणि विकी कौशलच्या आगामी सिनेमाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या सिनेमाची रिलीज डेट मात्र समोर आली आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्यानंतर 'फुकरे 3' या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. 

Maharashtrachi Kitchen Queen : जमणार महाराष्ट्रभरातून सुगरणी, रंगणार चवींचा खेळ

Maharashtrachi Kitchen Queen : छोट्या पडद्यावर खवय्यांसाठी अनेक खवय्येगिरीचे कथाबाह्य कार्यक्रम असतात. असच खवय्येगिरीला अजून रुचकर बनवण्यासाठी एक नवा खमंग असा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'महाराष्ट्राची किचन क्वीन' (Maharashtrachi Kitchen Queen) हा कार्यक्रम 15 मे पासून सुरु होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील (Maharashtra) सुगरणींमध्ये स्पर्धा रंगणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या खाद्यासंस्कृती देखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 

15:05 PM (IST)  •  08 May 2023

Priya Bapat: 'मला खूप जणं विचारतात लग्नानंतर मी माझं आडनाव का नाही बदललं?'; प्रिया बापटच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Priya Bapat: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. प्रियाचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेक नेटकरी तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. प्रिया ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करते. नुकतीच प्रियानं वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 

View this post on Instagram
 
A post shared by Priya Bapat (@priyabapat)

15:05 PM (IST)  •  08 May 2023

The Kerala Story: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'द केरळ स्टोरी'ला शबाना आझमींचा सपोर्ट; ट्वीट शेअर करत म्हणाल्या...

The Kerala Story:   'द केरळ स्टोरी' (The Kerala Story)  हा चित्रपट काल (5 मे)  प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी काही जण करत आहेत. या चित्रपटाला काही लोक विरोध करत आहेत तर काही लोक या चित्रपटाला पाठिंबा देत आहेत. आता बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी  (Shabana Azmi) यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्ररटाला ट्वीट शेअर करुन सपोर्ट केला आहे. 

14:55 PM (IST)  •  08 May 2023

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परीची हिंदी मालिकेत एन्ट्री

Myra Vaikul New Serial : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेच्या माध्यमातून वयाच्या चौथ्या वर्षी छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी मायरा वैकुळ (Myra Vaikul) सध्या चर्चेत आहे. मराठी मालिका विश्व गाजवल्यानंतर मायरा आता हिंदी मालिकेत एन्ट्री करत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

14:16 PM (IST)  •  08 May 2023

Priyanka Chopra Daughter : प्रियांका चोप्राच्या लाडक्या लेकीचा आवाज चाहत्यांनी पहिल्यांदाच ऐकला; 'देसी गर्ल'ने शेअर केला व्हिडीओ

Priyanka Chopra With Daughter Malti Mary : 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता तिने लाडकी लेक मालतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मालतीचा आवाज ऐकू येत आहे. प्रियंकाच्या या व्हिडीओमुळे चाहत्यांनी पहिल्यांदाच मालतीचा आवाज ऐकला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Priyanka (@priyankachopra)

13:09 PM (IST)  •  08 May 2023

The Kerala Story : कुठे मोफत शो तर कुठे महिलांसाठी विशेष स्क्रीनिंग; भाजप नेत्यांचा 'द केरळ स्टोरी'ला पाठिंबा!

The Kerala Story Maharashtra Special Show : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत आहे. 'द कश्मीर फाइल्स'प्रमाणे (The Kashmir Files) 'द केरळ स्टोरी'लादेखील मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तर दुसरीकडे या सिनेमाचे नेत्यांकडून खास शो आयोजित केले जात आहेत. देशभरात या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात भाजप नेत्यांकडून 'द केरळ स्टोरी'चे मोफत शो आणि महिलांसाठी विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात येत आहे. 

वाचा सविस्तर

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Embed widget