The Kerala Story : 'द केरळ स्टोरी'ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली तब्बल 35.75 कोटींची कमाई
The Kerala Story : 'द केरळ स्टोरी'ला वीकेंडला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
The kerala Story Box Office Collection : वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा 5 मे 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर वीकेंडलादेखील या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे.
'द केरळ स्टोरी'ची तीन दिवसांची कमाई जाणून घ्या... (The Kerala Story Box Office Collection Day 3)
'द केरळ स्टोरी' या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे या सिनेमावर टीका होत असताना काही मंडळींना पात्र हा सिनेमा भावला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 8.3 कोटी, दुसऱ्या दिवशी 11.22 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 16.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 35.75 कोटींचा गल्ला जमवला आहे.
- पहिला दिवस : 8.3 कोटी
- दुसरा दिवस : 11.22 कोटी
- तिसरा दिवस : 16.50 कोटी
The Kerala Story Day 3 Night Occupancy: 55.60% (Hindi) (2D)
— Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) May 7, 2023
#TheKeralaStory
https://t.co/3VYOPvp3AX
'द केरळ स्टोरी' लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यास सज्ज!
'द केरळ स्टोरी' हा सिनेमा लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. या सिनेमाचं कथानक सत्य असल्याचा दावा कलाकार आणि दिग्दर्शकांकडून करण्यात आला आहे. तर काही मंडळी मात्र या सिनेमाचं कथानक खोटं असल्याचं म्हणत आहेत. पण तरीही सिनेमाची मांडणी, कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन या सर्व गोष्टी सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरल्या आहेत.
अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इडनानी आणि सोनिया बलानी स्टारर 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा जगभरात चर्चेत आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा 'द कश्मीर फाइल्स'चा रेकॉर्ड मोडणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. केरळमधील मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आहे.
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'द केरळ स्टोरी'
'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुदीप्तो सेन यांनी सांभाळली आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सिनेमाची कथा चार महिलांची आहे. ज्यांना मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.
संबंधित बातम्या