ABP Majha Headlines : 9 AM : 25 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 AM : 25 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Assembly Election 2024 Result Maharashtra) जाहीर झाला. महायुतीनं (Mahayuti) यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha) निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवलं. तर महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aaghadi) दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील अनेक दिग्गजांचा पराभव झाला. यामध्ये काँग्रेसचे विधीमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचा समावेश आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण मतदारसंघातून भाजपाच्या अतुल भोसले यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. तर, संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांना भाजपच्या अतुल खताळ यांनी हरवलं. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास काँग्रेसकडून हे दोन नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चालू होती. मात्र, काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.
![Job Majha:भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी 06 Feb 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/ca334a297a5383fc125009cff4e8ee351738849866318718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ajit Pawar AK 47 Funny : महायुतीच्या बातम्या नीट द्या...नाहीतर उडवून टाकू! दादांची फटकेबाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/e2c617300ce139e4027a1ae26b25aca11738849213202718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Karuna Sharma : मुंडे घराण्याचा एकमेवं वारस बेरोजगार आहे,करुणा शर्मांची स्फोटक मुलाखत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/a77c854a3d03b678119e593ed8701d6b1738845663601718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Gunaratna Sadavarte : अंजली दमानियांचा मुंडेंच्याशी काय संबंध? गुणरत्न सदावर्ते नेमकं का संतापले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/613051910ce0bca5f5cb264bae3b09ab1738845281547718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Seeshiv Munde Dhananjay Munde : माझे वडील धनंजयच माझी काळजी घेतात, मुंडेंच्या मुलाची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/27a16713db17145bc565df53b2728e621738844347784718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)