एक्स्प्लोर

Ek Number Super : 'एक नंबर... सुपर' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज ; प्रथमेश परबची प्रमुख भूमिका

मिलिंद कवडे यांच्या 'एक नंबर... सुपर' (Ek Number Super) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.

Ek Number Super : समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर विनोदी शैलिनं सादर करत रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी झालेले दिग्दर्शक मिलिंद कवडे (Milind Kavde) बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 'एक नंबर' असं टायटल असलेल्या या चित्रपटाच्या रूपात मिलिंद यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं फुल टू मनोरंजन करणारा चित्रपट बनवला आहे. 'टकाटक' या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर मिलिंद कवडे यांच्या 'एक नंबर... सुपर' (Ek Number Super) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आला आहे. 11 मार्च 2022 रोजी 'एक नंबर... सुपर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'एक नंबर... सुपर' या चित्रपटाची निर्मिती महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी धुमाळ प्रोडक्शन आणि आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगानं केली आहे. दिग्दर्शनासोबत 'एक नंबर'ची कथा व पटकथा मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे, तर संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. काहीशा वेगळ्या जॅानरच्या माध्यमातून मनोरंजनाद्वारे एखादा विचार देणाऱ्या मिलिंद यांच्या कारकिर्दीतील 'एक नंबर... सुपर' हा आणखी एक वेगळ्या पठडीतील चित्रपट आहे. टायटलप्रमाणेच चित्रपटाचा ट्रेलरही 'एक नंबर' बनला आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये, श्रवणीय संगीत, मार्मिक संवाद, नयनरम्य लोकेशन्स आणि विषयाचं गांभीर्य अधोरेखित करणारा हा ट्रेलर तरुणाईसोबतच सर्वच वयोगटातील प्रेक्षकांच्या आकर्षणाचं केंद्र बनला आहे. या चित्रपटातील 'बाबूराव...' आणि 'तुकडे तुकडे...' ही गाणी अगोदरच पॅाप्युलर झाली असून याचा फायदा ट्रेलर आणि त्या अनुषंगाने 'एक नंबर... सुपर'लाही नक्कीच होणार आहे.

'टकाटक'नंतर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी मिलिंद यांनी पुन्हा एकदा प्रथमेश परबचीच निवड केली आहे. त्यामुळं या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना पुन्हा एकदा मिलिंद-प्रथमेश जोडीची केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. प्रथमेशच्या जोडीला यात मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा ढावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी अशी भलीमोठी मराठी कलाकारांची फौज आहे, जी प्रेक्षकांचं मनसोक्त मनोरंजन करणार आहे. संजय नवगिरे आणि सुनिल मगरे या चित्रपटाचे पटकथा सहाय्यक आहेत. सिनेमॅटोग्राफर हजरत शेख (वली) यांच्या नजरेतून हा चित्रपट पहायला मिळणार आहे. अभिनय जगताप यांनी या चित्रपटाचं बँग्राऊंड म्युझिक दिलं असून, संकलनाची जबाबदारी प्रणव पटेल यांनी सांभाळली आहे.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget