एक्स्प्लोर
दिशा पटानीच्या शुभेच्छांवर आदित्य ठाकरेंचं उत्तर, म्हणाले...
काल शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता. तसेच बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा देखील वाढदिवस होता. या निमित्ताने तिने काल आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं ट्वीट केलं. या ट्वीटला आदित्य यांनी उत्तर दिलं आहे.
मुंबई : काल शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता. त्यांच्यासह कधी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या अफेअरमुळे कधी आदित्य ठाकरेंशी नाव जुळल्यामुळं तर सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे चर्चेत असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा देखील वाढदिवस होता. या निमित्ताने तिने काल आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं ट्वीट केलं. या ट्वीटला आदित्य यांनी उत्तर दिलं आहे. 'वाढदिवसाच्या शुभेच्छा, स्टे दी अमेझिंग यू अँड कीप शायनिंग' असं तिनं म्हटलं आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी तिला उत्तर देताना 'खूप खूप धन्यवाद दिशा! तू अशा काही लोकांपैकी एक आहेस, ज्यांना मी 13 जून रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी 'सेम टू यू' म्हणू शकतो! कीप शायनिंग अॅंड रायझिंग!' असं आदित्य यांनी म्हटलंय.
दिशाचं ट्वीट
दिशाला आदित्य ठाकरेंनी दिलेलं उत्तरHappiest b’day @AUThackeray stay the amazing you and keep shining ????❤️
— Disha Patani (@DishPatani) June 13, 2020
13 जून 1992 ही दिशाची जन्मतारीख आहे. काल तिचा 28 वा वाढदिवस होता. तर 13 जून 1990 ही आदित्य ठाकरे यांची जन्मतारीख आहे. काल आदित्य यांचा 30 वा वाढदिवस होता. डिनर डेटवर गेलेल्या आदित्य ठाकरे आणि दिशा पटानीचा वाढदिवसही एकाच दिवशी! आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी हे दोघे चांगले मित्र आहेत. ते काही वेळा डिनर डेटला गेल्याची देखील माहिती समोर आली होती. गेल्यावर्षी आदित्य यांच्यासोबत डिनर डेटला गेल्यावर दिशाला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी तिनं 'मित्रासोबत लंच किंवा डिनरला जाऊ शकत नाही का, असा प्रश्न ट्रोलर्सना विचारला होता. पुरुष किंवा स्त्री यावरुन मी मित्रांची निवड करत नाही. मी ज्याच्यासोबत फिरते ते माझे मित्रच आहे. मी केवळ मुलींसोबतच मैत्री करत नाही. प्रत्येकाचेच मुली आणि मुलं असे मित्र असतात, असं दिशा म्हणाली होती. Aditya Thackeray | दिशा पटानीबाबत काय म्हणाले आदित्य ठाकरे? | ABP Majha दिशा पटानीबद्दलच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी हात जोडले! दिशाबाबत अनेकदा आदित्य यांनी दिलेल्या मिश्किल उत्तरांमुळं त्यांची मैत्री चर्चेच असते. विधानसभा निवडणुकीदरम्यान तुमच्या प्रचारालाचा खास बॉलिवूड सेलिब्रिटी येणार का? या प्रश्नावर आदित्य ठाकरे काहीसे लाजले होते. बॉलिवूड सेलिब्रिटी तुमच्या प्रचाराला येणार आहे का, ज्याच्यामुळे तुमच्या प्रचाराला वेगळी 'दिशा' मिळेल? यावर आदित्य ठाकरे काहीसे लाजले आणि आमचा सेलिब्रिटी हा शिवसैनिक असतो," असं उत्तर त्यांनी दिलं होतं. बॉलिवूड सेलिब्रिटीमुळे तुमच्या प्रचाराला 'दिशा' मिळेल? आदित्य ठाकरे म्हणाले... काही महिन्यांपूर्वी संगमनेरमधील एका कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी युवा आमदारांची मुलाखत घेतली होती. यावेळी गुप्ते यांनी 'आई मुलाची जबाबदारी तो मोठा होईपर्यंत घेते, नंतर ती जबाबदारी दुसऱ्या कुणाकडं तरी देते. रश्मी वहिनींनी किती वर्षे तुमची जबाबदारी घ्यायची असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारला होता. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले होते की, 'आता आमदार म्हणून माझी जबाबदारी आईनं मुख्यमंत्र्यांकडं सोपवली आहे. त्यावर अवधूत गुप्तेंनी पुन्हा विचारलं, आम्हाला मध्ये मध्ये बातम्या येत असतात, आप कुछ भी बोलो, हमे आपकी बात ‘पटनी’ चाहिए. यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची ‘दिशा’ चुकलेली आहे, असं म्हटलं होतं. वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंचं 'ते' आवाहन कार्यकर्त्यानं पाळलं, सात दिवसाच्या बाळाचे प्राण वाचलेThank you so much Disha! One of those few people who I can say “same to you” on 13th of June for a birthday wish! Keep shining and rising!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 13, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement