एक्स्प्लोर

बॉलिवूड सेलिब्रिटीमुळे तुमच्या प्रचाराला 'दिशा' मिळेल? आदित्य ठाकरे म्हणाले...

उमेदवारी जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडला. निवडणुकीच्या प्रचारात अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळतात. याच संदर्भात आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला

मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. सेलिब्रिटींनी एखाद्या उमेदवाराचा प्रचार करणं ही बाब आता नवी नाही. परंतु तुमच्या प्रचारालाचा खास बॉलिवूड सेलिब्रिटी येणार का? या प्रश्नावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे काहीसे लाजले. कारण हा प्रश्न अप्रत्यक्षरित्या दिशा पाटनीसंदर्भात होता. उमेदवारी जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडला. निवडणुकीच्या प्रचारात अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळतात. याच संदर्भात आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला की, "बॉलिवूड सेलिब्रिटी तुमच्या प्रचाराला येणार आहे का, ज्याच्यामुळे तुमच्या प्रचाराला वेगळी 'दिशा' मिळेल? यावर आदित्य ठाकरे काहीसे लाजले आणि आमचा सेलिब्रिटी हा शिवसैनिक असतो," असं उत्तर देत या प्रश्नाला हसतहसत बगल दिली. खरंतर काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पाटनी एकत्र दिसले होते. डिनर किंवा लंचसाठी गेलेले हे दोघे अनेकदा कॅमेऱ्यातही कैद झाले होते. त्यामुळे दोघांमध्ये नक्की काय चाललंय असा प्रश्नही विचारला जात होता. योगायोग म्हणजे दोघांचा वाढदिवसही एकाच दिवशी येतो. या दोघांची मैत्री पाहता प्रचाराला दिशा पाटनी येणार की नाही असा अप्रत्यक्ष प्रश्न विचारण्यात आल्या. त्यावर आदित्य ठाकरेंनी थेट उत्तर देणं टाळलं. संबंधित बातम्या विविध भाषांमधील होर्डिंगवर आदित्य काय म्हणाले? वरळी मतदारसंघात शिवसेनेकडून वेगवेगळ्या भाषेतून पोस्टर लावण्यात आले होते. त्यावरुन आदित्य आणि शिवसेनेवर टीका होत आहे. याविषयी आदित्य ठाकरे म्हणाले की, "गुपित फोडण्यापेक्षा आणखी 24 तास थांबा, हा कॅम्पेनचा पहिला टप्पा आहे. या कॅम्पेनचा दुसरा टप्पा यायचा आहे. ज्यांनी टीका केली आहे त्यांनी आमच्या दुसऱ्या टप्प्यांची वाट पाहावी. आम्हाला काय बोलायचं आहे ते कळेल."

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget