Dilip Kumar Funeral : दिलीपकुमार यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Dilip Kumar Passed Away - अभिनेते दिलीपकुमार यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा सूचना दिल्या आहेत.
Dilip Kumar Passes Away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना 29 जून रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर येत होती. परंतु, प्रकृती अस्वास्थामुळे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी अभिनेते दिलीपकुमार यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा सूचना दिल्या आहेत.
Dilip Kumar : 'लखलखता तारा निखळला', दिलीप कुमारांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेते भावूक
दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. याच कब्रस्तानमध्ये मोहम्मद रफी,मधुबाला, मजरूह सुल्तानपुरी अन्य अनेक सेलिब्रिटींवर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान दिलीप कुमार यांचं चित्रपट सृष्टीतील योगदान पाहता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दिलीप कुमार यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत.
Dilip Kumar : बॉलिवूडच्या 'ट्रॅजेडी किंग'चा मोहम्मद युसूफ खान ते दिलीप कुमारपर्यंतचा प्रवास!
दिलीप कुमार यांच्या आधी आणि दिलीपकुमार यांच्यानंतर...- अमिताभ बच्चन
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांनी दिलीपकुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'जेव्हा भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तो ‘दिलीप कुमार यांच्या आधी आणि दिलीपकुमार यांच्यानंतर' असा लिहिला जाईल. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, असं ट्वीट करत अमिताभ बच्चन यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
दिलीप कुमारांचं जाणं सांस्कृतिक जगतासाठी एक क्षती - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीप कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तसंच दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांना फोनवरून पंतप्रधानांनी धीर दिला आहे. सिनेसृष्टीतील एक आख्यायिका म्हणून दिलीपकुमारजी यांची आठवण कायम राहील. त्यांना अद्वितीय प्रतिभेचा आशीर्वाद मिळाला होता, त्यामुळेच अनेक पिढ्यांचे दर्शक मंत्रमुग्ध झाले. त्यांचं निघून जाणं आपल्या सांस्कृतिक जगतासाठी एक क्षती आहे. त्यांच्या कुटुंबीय, मित्र आणि असंख्य चाहत्यांप्रती संवेदना, श्रद्धांजली', असं आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला एक लखलखता तारा निखळला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजरामर भूमिका साकारणारे, दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भारतीय चित्रपट सृष्टीच्या लौकिकात भर घालणारी, त्याला सातासमुद्रापार नेणारी अशी दिलीप कुमार यांची कारकिर्द आहे. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. नेहमीच्या जगण्यातही त्यांनी आपल्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणे चित्रपटसृष्टीचा रूबाब वागवला आणि वाढवला. मेहनतीच्या जोरावर कला क्षेत्रात स्थान निर्माण करता येते, असा संदेश देणारी त्यांची वाटचाल होती. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा स्नेहबंध होता. कला क्षेत्राविषयीची आत्मियता हा अतूट धागा या दोघांमध्ये होता. अजरामर भूमिका साकारणारे चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामरच राहील. त्यांच्या निधनामुळे रूपेरी नभांगणातील एक लखलखता तारा निखळला आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.