Dharmaveer : चित्रपटातील आनंद दिघे यांच्या मृत्यूचा प्रसंग पाहणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं, म्हणाले...
Dharmaveer : चित्रपटात शेवटच्या 10 मिनिटांत आनंद दिघे यांच्या जीपला झालेला अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे.
Dharmaveer : 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer Mukkam Post Thane) या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी आनंद दिघे (Anand Dighe) यांचा प्रवास पडद्यावर उभा केला आहे. अलिकडेच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धर्मवीर चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावली. त्यांनी पत्नीसह चित्रपट पाहिला. चित्रपटातील आनंद दिघे यांच्या मृत्यूचा प्रसंग पाहणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं. 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' या चित्रपटातील आनंद दिघे यांचा अपघात आणि त्यानंतर रुग्णालयात उपचारा दरम्यान झालेल्या मृत्यूचा प्रसंग पाहाणं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळलं.
उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाचा शेवट न पाहताच चित्रपटगृह सोडलं
चित्रपटात आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या सीन आधी मुख्यमंत्र्यांनी चित्रपटगृह सोडलं. चित्रपटात शेवटच्या 10 मिनिटांत आनंद दिघे यांच्या जीपला झालेला अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. अपघातानंतर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आनंद दिघे, त्यांची सिंघनिया रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी आलेले तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे तसंच आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर सिंघनिया रुग्णालयात एकत्र धाव घेतलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असे काही प्रसंग चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आले आहेत.
'मी चित्रपटाचा शेवट पाहू शकलो नाही'
मिलिंद नार्वेकर यांच्या घरगुती गणपतीचे दर्शन घेऊन आनंद दिघे ठाण्यात परततात, हा चित्रपटातील प्रसंग संपतातच उद्धव ठाकरे चित्रपटगृहातून बाहेर पडले. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, 'मी चित्रपटाचा शेवट पाहू शकलो नाही. आनंद दिघे यांच्या अपघातानंतर मी व्यतिथ झालेले बाळासाहेब पहिले आहेत. आनंद दिघे यांचा मृत्यू शिवसैनिकांवर आघात होता.'
संबंधित बातम्या